मुंबई- विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली देखील जोरदार सुरु आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते आणि आमदारांच्या उड्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अशीच उडी अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे मारतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आमदार राजेंद्र शिंगणे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसून आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता थेट राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात परतण्याचे संकेत दिले आहेत. मी मागे नाईलाजाने अजित पवारांसोबत गेला, पण मी शरद पवारांनाच आदरणीय मानतो, असं ते म्हणाले आहेत.