Ajit Pawar: "पोटात गोळा आलेला पण फडणवीस होते निवांत"; अजितदादांनी सांगितला हेलिकॅाप्टर ढगात भरकटल्यानंतरचा अनुभव

कार्यक्रमानिमित्त नागपूर-गडचिरोली मार्गावर जात असताना आजच अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर भरकटलं होतं.
Ajit Pawar Devendra Fadnavis
Ajit Pawar Devendra FadnavisEsakal
Updated on

नागपूर : कार्यक्रमानिमित्त नागपूर-गडचिरोली मार्गावर जात असताना आजच अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर भरकटलं होतं. यावेळचा किस्सा अजित पवार यांनी कार्यक्रमात सांगितला. पोटात गोळा आला होता पण फडणवीस निवांत होते असं त्यांनी यावेळी म्हटलं.

Ajit Pawar Devendra Fadnavis
Sambhaji Raje: विशाळगड मोहीम फत्ते..! पक्षाकडून संभाजीराजे छत्रपती यांचा हिंदूपदपातशाह म्हणून उल्लेख

अजित पवार म्हणाले, आम्ही हेलिकॉप्टरमधून उतरलो तेव्हा बाबा अत्राम मला म्हणाले, "पाऊस होता, ढग होते, त्यामुळं आता हेलिकॉप्टर कसं येणार? मग कसं उतरणार? त्यामुळं आम्ही सगळे जण चिंतेत होतो. त्यामुळं कार्यक्रम रद्द होईल आणि आम्हालाच भूमिपुजन करावं लागेल का? असं आम्हाला वाटतं होतं."

हेलिकॉप्टरमधून सुरुवातीला नागपूरहून उड्डाण केल्यानंतर बरं वाटलं. पण नंतर जसं काही ते ढगात शिरलं तर इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग. पण तेव्हा आमचे देवेंद्र फडणवीस मस्त गप्पा मारत बसले होते. मी त्यांना म्हटलं, "अहो बघा जरा बाहेर काहीही दिसत नाही. झाड दिसत नाही, जमीन दिसेना. त्यावर ते म्हणाले काही काळजी करु नका. आत्तापर्यंत माझे सहा अपघात झालेले आहेत. मी जेव्हा हेलिकॉप्टर आणि विमानात असतो तेव्हा अपघात झाला तरी मला काही होत नाही. त्यामुळं तुम्हालाही काही होणार नाही. यावर मी म्हटलं अरे बाबा हे काय सांगतोय, एकतर पोटात गोळा आलेला आहे. एकतर आज एकादशी त्यामुळं सारखं पांडुरंग पांडुरंग असं मनात नाव घेत होतो आणि या महाराजांचे आम्हाला उपदेश सुरु होते.

Ajit Pawar Devendra Fadnavis
Mumbai Aqua Line Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिली भूमिगत मेट्रो 'या' दिवसापासून धावणार

काही काळजी करु नका असं ते म्हणत होते आणि खरोखरचं येईपर्यंत ते खूपच निवांत होते. ते म्हणाले माझे अनेक अपघात झालेले आहेत, कधी माझ्या नखालाही धक्का लागलेला नाही. पण अशा पद्धतीनं बापजादांच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोहोचलेले आहेत. त्यांची पुण्याई निश्चितपणे आमच्या उपयोगी पडलेली आहे. यावेळी खरोखरच सर्वजणांमध्ये धाकधुकच होत होती. माझ्या बाजुला उदय सामंत बसलेले होते. त्यांनी मला म्हटलं दादा जमीन दिसायला लागली खाली. मग मी म्हटलं बरं झालं बाबा, अशा शब्दांत अजित पवारांनी हेलिकॉप्टर भरकटलेला किस्सा कथन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.