राज्याच्या राजकारणत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी मुंबईत नेते कार्यकर्त्यांच्या बैठका बोलवल्या आहेत. कोणत्या बैठकीला कोण पोहचणार यावरून कोणाला किती आमदारांचा पाठिंबा याचा निर्णय होणार आहे.
यादरम्यान अजित पवारांच्या गोटातून काही नेते परत येण्याचा ओघ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारा यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नेते, आमदरांची बैठक मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरवर बैठक बोलवली आहे.
दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, या बैठकीसाठी अजित पवारांचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार, शिरुरचे आमदार अशोक पवार आणि आमदार किरण लहामाटे हे काहीवेळापूर्वीच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार गटाकडे आतापर्यंत ४० आमदारांचे प्रतिज्ञापत्र आल्याची सूत्रांची माहिती होती. यादरम्यान अपक्ष देवेंद्र भुयार हे अजित पवार गटामध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र सध्यातर ते वाय. बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणाचे नियंत्रण राहणार यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात रस्सिखेच सुरु आहे. या राजकीय लढाईसाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून आज मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.
शरद पवार यांनी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी १ वाजता तर अजित पवार यांच्या गटाकडून वांद्रे येथील एमईटी संस्थेत बैठक ठेवली आहे. या बैठकत कोण कोण उपस्थित राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यापूर्वी अजित पवार गटाकडे ४२ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला जात होता.मात्र अजित पवारांच्या गटाला आता गळती लागल्याचे दिसायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.