मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

Ajit pawar ncp decisions taken in first cabinet meeting in presence of Ajit Pawar of CM shinde Fadnavis govt
Ajit pawar ncp decisions taken in first cabinet meeting in presence of Ajit Pawar of CM shinde Fadnavis govt
Updated on

अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घतल्यानंतर आज शिंदे-फडणीस सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

आज पार पडलेल्या या महत्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती’ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे

Ajit pawar ncp decisions taken in first cabinet meeting in presence of Ajit Pawar of CM shinde Fadnavis govt
Mumbai-Agra highway Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे –

  • राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन

  • मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती’ योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती

  • दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता

  • नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार

  • सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.

  • नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र

  • मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे.

Ajit pawar ncp decisions taken in first cabinet meeting in presence of Ajit Pawar of CM shinde Fadnavis govt
Maharashtra Politics : राज ठाकरेंनी दोनदा पाऊल पुढं टाकलं, पण…; राज-उद्धव युतीवर मनसे नेत्याचं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.