Ajit Pawar: अजित पवारांनी शंका उपस्थित केलेला 'तो' आमदार कोण?, आतली गोष्ट सांगतोय बाहेर

Ajit Pawar: अजित पवार यांनी यावेळी मोठा दावा देखील केला आहे. एनडीएकडे सध्या 293 खासदार आहेत. पण संसदेच्या अधिवेशनानंतर हा आकडा 300 पार होणार आहे.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

Ajit Pawar:

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन झाल्यानंत काल शरद पवार गट व अजित पवार गटाने वर्धापन दिनाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. दोन्ही मेळाव्यांनी कालचा (सोमवार) दिवस गाजवला. अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीतील पराभव पचवत विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.  यावेळी अजित पवार यांनी बोलताना आपल्याच आमदारावर शंका उपस्थित केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तो आमदार कोण?, अशी चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षातील आमदारावर शंका उपस्थित केली. आपल्यातील कोणतातरी आमदार आतली माहिती बाहेर पुरवतो. नौटंकी चाललीय, अशा शब्दात अजित पवार यांनी खडे बोल सुनावले.

अजित पवार यांनी यावेळी मोठा दावा देखील केला आहे. एनडीएकडे सध्या 293 खासदार आहेत. पण संसदेच्या अधिवेशनानंतर हा आकडा 300 पार होणार आहे, असा दावा अजित पवारांनी केला. त्यामुळे आता कोणत्या पक्षातील, कोणते खासदार फुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज्यघटना बदलण्याचा भ्रम पसरवण्यात आला, त्यामुळे आम्हाला नुकसान सहन करावे लागले. ते म्हणाले की, महाविकास आघाडीला 43.90 टक्के मते मिळाली ज्यामुळे त्यांना 30 जागा मिळाल्या, तर महायुतीला 43.30 टक्के मते मिळाली आणि आम्हाला 17 जागा मिळाल्या. ही संपूर्ण निवडणूक लोकांमध्ये साशंकता निर्माण करून जिंकली असल्याचे ते म्हणाले. पण विधानसभा निवडणुकीत असे होणार नाही. आम्ही तिन्ही मित्र पक्ष पूर्ण समन्वयाने विधानसभा निवडणूक लढवू आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करू.

Ajit Pawar
NCP Ajit Pawar: शरद पवार यांचं नाव घेताना अजित पवार भावूक, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

शरद पवार काय म्हणाले?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत पक्षाचा स्थापना दिवस साजरा केला, तर काका शरद पवार पुण्यातील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. आपल्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि इतर नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा झेंडा फडकावल्यानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे संस्थापक म्हणाले, गेल्या 25 वर्षात आपण पक्षाची विचारधारा पसरवण्याचे काम केले आहे. येत्या तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून त्यासाठी काम करणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे कारण निवडणुकीनंतर राज्याची सत्ता तुमच्या हातात असेल.

Ajit Pawar
Tax Devolution: मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर सर्वाधिक पैसे यूपी-बिहारला; मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला कमी रक्कम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.