Sharad Pawar : अजित पवार गटाचा 'गद्दार' असा उल्लेख; शरद पवारांच्या बैठकीपूर्वी दिल्लीत झळकले बॅनर

Sharad Pawar : अजित पवार गटाचा 'गद्दार' असा उल्लेख; शरद पवारांच्या बैठकीपूर्वी दिल्लीत झळकले बॅनर
Updated on

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी दिल्लीत अजित पवार गटाचा 'गद्दार' असा उल्लेख करीत बॅनर्स झळकले आहेत.

काल आमदार, खासदार, राज्य कार्यकारणी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज गुरुवारी 6 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. पक्षावर पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून मोठी पावले उचलली जात आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

Sharad Pawar : अजित पवार गटाचा 'गद्दार' असा उल्लेख; शरद पवारांच्या बैठकीपूर्वी दिल्लीत झळकले बॅनर
GST: 49 दिवसांत 4,972 बनावट GST नोंदणी रद्द, 15,000 कोटींहून अधिक करचोरी पकडली

दरम्यान, त्यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दिल्लीत 'गद्दार' असा उल्लेख करुन बॅनर लावले. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरही लावण्यात आले. दिल्ली महानगर पालिकेनेकारवाई करीत बॅनर हटवले आहेत.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाले आहेत. सकाळी 8 वाजता सिल्वर ओक निवासस्थानावरून मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय कार्यकारणी पार पडणार आहे.

Sharad Pawar : अजित पवार गटाचा 'गद्दार' असा उल्लेख; शरद पवारांच्या बैठकीपूर्वी दिल्लीत झळकले बॅनर
Share Market Opening: कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 65,400 च्या खाली, आयटी-मेटल शेअर्समध्ये विक्री

दरम्यान, काल अजित पवार गटाने घेतलेल्या मेळाव्यानंतर त्यांच्याकडे संख्याबळ असल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यांच्या नेत्यांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केलं. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि खुद्द अजित पवारांनी काकांवर गंभीर आरोप करीत टीकास्र सोडलं होतं. त्यामुळे आता शरद पवारांनी काढलेल्या राज्यव्यापी दौऱ्यात राजकारण रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.