Jayant Patil: "एकनाथ शिंदेंना अजित पवार पर्याय, त्यांना परत जायला संधी", जयंत पाटलांचा टोला

Jayant Patil
Jayant Patil
Updated on

Jayant Patil:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठा बंड झाला. अजित पवार यांनी अखेर शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र शरद पवार यांनी अजित पवार यांच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

जयंत पाटील म्हणाले, राज्यात आणखी एक पक्ष फोडण्याचं काम करण्यात आलं आहे. सत्तेत असणाऱ्यांना बहुमत असताना पुन्हा विरोधी पक्ष फोडण्याचे काम केले. आधी शिवसेना फोडली त्यातली लढा सुप्रिम कोर्टात गेला. कोर्टाने काय निर्णय दिला ते सर्वांना माहित आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा असं घडेल असं वाटल नव्हत. पण सत्ताधाऱ्यांनी पुन्हा हे पाऊल टाकले. (Ajit Pawar NCP News)

देशात नऊ राज्य आहेत त्याठीकाणी विरोधी पक्ष फोडण्याचे काम होत आहे. विरोधकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास दाखवला आहे. महाराष्ट्रात फोडाफोडी राजकारण थांबावे या भूमिकेला ज्यांचा पाठिंबा आहे ते महाराष्ट्रभर पाठिंबा देतील. बंडखोरी केलेल्या आमदारांवर आम्ही कारवाईबाबत अभ्यास केला नाही, असे जयंत पाटील यांना स्पष्ट केले.

ऑपरेशन लोटस हे भाजपचे चिन्ह आहे. अजित पवार सर्व आमदारांना भेटले. त्यांच्या सह्या घेतल्या याबाबत आमदारांना काही माहित नव्हते, काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil
Ajit Pawar : प्रफुल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळात? राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार

जयंत पाटील म्हणाले, पक्ष फोडून ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार आणखी स्पष्ट भूमिका मांडणार. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पुन्हा सांगतो भाजप-शिंदे गटाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. पक्षाचे धोरण उल्लंघन करून शपथ घेतली त्यांना देखील पाठिंबा नाही. त्यांना कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. या महाराष्ट्र राजकारण बेरजेचे असेल पाहिजे. शाहू फुले आंबेडकर विचार टिकला पाहीजे, असे जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे जोरात चालले होते. ते कोणाचे ऐकत नव्हते. काही लोकांना एकनाथ शिंदेंचा राग असावा. त्यामुळे त्यांना पर्याय निर्माण करण्यासाठी भाजपने असे केले असेल. एकनाथ शिंदे शिवसेना सोडताना म्हणाले अजित पवार यांच्यामुळे अन्याय झाला. आता अजित पवार तिकडे आले आहेत त्यामुळे त्यांना परत जायला संधी आहे. अजित पवार यांनी पक्षाला राजीनामा दिला हे पक्षाला कळवले असते तर बरे झाले असते, असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil
Sharad Pawar: पवार पुन्हा ताकद लावणार.. पुन्हा वायबी सेंटर... बुधवारी बोलावली जम्बो बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.