NCP Constitution: अजितदादा गटाचे अस्तित्व धोक्यात, पक्षाच्या घटनेतील तरतूद ठरणार कळीचा मुद्दा! शरद पवारच बॉस

NCP Constitution
NCP Constitution
Updated on

NCP Constitution : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बंड झाला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचे युद्ध सुरू झाले आहे. शरद पवार हे पक्षप्रमुख असले तरी पक्षाचे बहुतांश आमदार त्यांच्यासोबत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर देखील दावा सांगितला आहे.

अजित पवार यांनी आज (मंगळवार, 4 जुलै) त्यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन देखील केले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे हे नवीन कार्यालय मुंबईतील मंत्रालयाजवळ (महाराष्ट्र सरकारचे मुख्यालय) असेल. त्याला राष्ट्रवादी भवन असे नाव देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून ही शिफारस केली होती.

मात्र या कारवाईचा काही परीणाम होणार नाही. आमच्याकडे बहुमत आहे, अशी भूमिका अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मांडली आहे. मात्र अजित पवार गटाला टेन्शन देणारी माहिती समोर आली आहे.

NCP Constitution
SSC HSC Supplementary Examination: दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट उद्या होणार उपलब्‍ध

राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेत कार्याध्यक्ष हे पद नाममात्र आहे. शरद पवार यांना कॅन्सर झाला असताना तारिक अनवर यांनी २००६ साली पक्षाच्या घटनेत अशी स्पष्ट तरतूद केली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीत राष्ट्रीय अध्यक्षांकडे सगळे अधिकार आहेत आणि कार्याध्यक्ष हे पद नाममात्र आहे, असे स्पष्ट म्हटले आहे.

पक्षाचे कोणत्याही नेमणुकीच्या अधिकार फक्त राष्ट्रीय अध्यक्ष यांनाच आहेत. त्यामुळे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेले निर्णय आणि नेमणूक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

NCP Constitution
Maharashtra Politics: २०२४ला आम्हीही मास्टरस्ट्रोक खेळू, संजय राऊतांचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.