Supriya Sule: "दादाबद्दल प्रेम राहिल तो माझा मोठा दादा.."; अजित पवारांविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावूक

Supriya Sule
Supriya Sule
Updated on

Supriya Sule: रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेतेपदावरून  राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले. राज्याच्या राजकारणात घडामोडी इतक्या वेगाने बदलल्या की कुणाला सुगावाही लागला नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह मोठा बंड केला.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवा मार्ग काढू. सर्व नवं उभं करायचं आहे. १९८० ची पुनरावृत्ती होणार नाही हे काळ ठरवेल. राष्ट्रवादीतून फूटन गेलेले सर्व लोक माझ्या कुंटुंबातील आहेत. मात्र नव्या उमदीने पक्ष उभा करू.

शरद पवार साहेब सगळ्यांसाठी प्रिय आहेत. त्यांनी सगळ्यांना घरातील मुलांसारखे वागवले. आज जी घटना झाली ती वेदना देणारी आहे. त्याची कारणे असतील. दादा बद्दल प्रेम राहिले तो मोठा दादा राहील. दादाशी कधीही मी वाद घालणार नाही. दादा आणि माझ्यात वाद होणार नाही. ते माझे मोठे भाऊ आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाले.

Supriya Sule
BRS on Ajit Pawar: "महाराष्ट्रातील पुढील CM बीआरएसचा"; अजित पवारांच्या शपथविधीनंतर BRS ची भूमिका

जेव्हा पक्षाचा प्रश्न येतो तेव्हा मी मी प्रोफेशनली बघते. २०१९  आणि २०२३ मध्ये चार वर्ष उलटली. थोडीशी जबाबदारी माझ्यावर आली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. नाती आणि कामात गल्लत नको, याची मला जाणीव आहे. अजितदादा माझा भाऊ आहे मी आयुष्यभर त्याच्यासोबत राहील. शरद पवार माझे वडील आहेत. मी त्यांचीही साथ सोडणार नाही.

Supriya Sule
NCP on Ajit Pawar: "अजित पवारांचा चेहरा शरद पवारांमुळे, त्यांनी लक्षात ठेवावे..."; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.