Sharad Pawar : अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना शरद पवारांकडून एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

Sharad Pawar : अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना शरद पवारांकडून एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
Updated on

मुंबईः अजित पवार गटातील सर्वच आमदारांनी शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला होता. त्याला शरद पवारांनी अत्यंत संयमितपणे उत्तर दिल्याचं दिसून आलं. एका वाक्यात शरद पवारांनी सगळ्या टीकाकरांचा समाचार घेतला.

सुरुवातीला बोलतांना शरद पवार म्हणाले की, सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता राज्य कसा चालवू शकतो, हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देशाला दाखवून दिलं. महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल, याची काळजी घेतली आणि यासाठीच कष्ट घेतले.

Sharad Pawar : अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना शरद पवारांकडून एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
Sakal Maha Conclave : तिथं साखर कारखाना काढायचा धाडसी निर्णय 'त्यांनी' घेतला; असं कोणाबद्दल बोलले शरद पवार?

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलं आहे. आज देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. देशातील विरोधक एकत्र येत आहेत. विरोधकांच्या बैठकांमध्ये देशहितासंबंधी चर्चा होत आहेत.

पंतप्रधानांनी बारामतीमध्ये सांगितलं, होतं की देश कसा चालवायचा हे मी पवार साहेबांचं बोट धरुन शिकलो आणि नंतर ते बदलले. देशाचे नेते असलेले लोक पक्षाचेही नेते आहेत. परंतु बोलतांना त्यांच्याकडून सभ्यता पाळली जात नाही. देशात संवाद राहिलेला नसल्याचं पवार म्हणाले.

''राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले मात्र मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये कसं घेतलं? जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही, त्या विचाराच्या पंक्तीला जावून बसणं योग्य नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर माझी काहीही तक्रार नाही. नाशिकमध्ये पक्षाच्या ऑफिसमध्ये गडबड केली. ऑफिस कुणाचे राष्ट्रवादी पक्षाचे, तुम्ही पक्षात आहेत का? ह्याला अर्थ आहे का? असा ताबा घेणे योग्य नाही'' असं पवार नाशिकच्या घटनेबद्दल म्हणाले.

Sharad Pawar : अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना शरद पवारांकडून एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
Ajit Pawar: 'तर पवारांची अवलाद नाही...', २०१७साली भाजपसोबत युती का झाली नाही अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

अजित पवारांच्या सभेत नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, त्यांच्या सभेत माझ्याबद्दल काही बोलले. परंतु तिथं सगळ्यात मोठा फोटो माझा होता, बॅनर लावला त्यात फोटो माझा होता. त्यांना माहितंय आपलं नाणं चालणार नाही-खणकन् वाजत नाही, त्यामुळे माझे फोटो वापरत आहेत. गुरु म्हणायचं, पांडुरंग म्हणायचं आणि दुसरीकडे टीका करायची, असं म्हणून पवारांनी संयमितपणे अजित पवार गटाचा समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.