Ajit Pawar: अजित पवार दिवाळीनंतर सरकारमध्ये होणार होते सहभागी, 'या' कारणामुळे घेतला गडबडीत निर्णय

महाविकास आघाडी अधिक मजबूत होत असल्यामुळं आधी निर्णय घेतला
NCP leader Ajit Pawar
NCP leader Ajit Pawar esakal
Updated on

Ajit Pawar: अजित पवार सरकारमध्ये दिवाळी नंतर सहभागी होणार होते तसेच महाविकास आघाडी अधिक मजबूत होत असल्यामुळं सरकारमध्ये सहभागी होण्याचा आधी निर्णय अजित पवार यांनी घेतला. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा याला विरोध असल्याने अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेतला, असे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

शरद पवार यांनाही NDA च्या बैठकीला आणण्याचे प्रयत्न सुरू होते पण शरद पवार यांचा मात्र त्याला विरोध होता. काल दिल्लीत झालेल्या बैठकीसाठी शरद पवार यांना बोलावलं देखील होतं पण त्यांनी येण्यास नकार दिला.

2 दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून मनधरणी करत होते, पण पवार मात्र विरोधावर ठाम होते. राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू होत्या. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. 

NCP leader Ajit Pawar
Marathi News Update: मुंबईसह देशभरातील पावसाची स्थिती जाणून घ्या, एका क्लिकवर

शरद पवार यांचा सहभाग का महत्त्वाचा?

या महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार महाराष्ट्रातील एनडीए सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने विरोधी पक्षांच्या बैठकीतील पवारांचासह महत्त्वाचा आहे.

विशेष म्हणजे, 82 वर्षीय पवार यांच्याकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील प्रमुख नेते म्हणून पाहिले जात आहे.

अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची वायबी सेंटर येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, आम्ही शरद पवार यांना पक्षात फूट देऊ नये, अशी विनंती केल्याचं सांगितलं.

शरद पवार आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं अजित पवार यांच्या गटाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, माफी मागणं किंवा राष्ट्रवादीतील फुटीचा तिढा सोडवणं हा या भेटीचा उद्देश नसल्याचं आता समोर आलं आहे.

NCP leader Ajit Pawar
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.