Ajit Pawar Latest Update : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी शरद पवारांची दोनदा भेट घेतली. भेटीत शरद पवार यांनाही NDA च्या बैठकीला आणण्याचे प्रयत्न सुरू होते, पण शरद पवार यांचा मात्र त्याला विरोध होता.
काल दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी शरद पवार यांना बोलावलं होतं. पण 2 दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून त्यांची मनधरणी करत होते, पण शरद पवार मात्र विरोधावर ठाम होते, अशी माहिती 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, आम्ही शरद पवार यांना पक्षात फूट देऊ नये, अशी विनंती केल्याचं सांगितलं.
शरद पवार आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं अजित पवार यांच्या गटाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, माफी मागणं किंवा राष्ट्रवादीतील फुटीचा तिढा सोडवणं हा या भेटीचा उद्देश नसल्याचं आता समोर आलं आहे.
विरोधी पक्षांची बैठक सुरू असतानाच, विरोधकांनी लढायचे आणि जिंकायचे, असं ट्विट शरद पवारांनी केलं होतं. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल इत्यादी नेते विरोधी पक्षांच्या बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.