Sharad Pawar: पवार पुन्हा ताकद लावणार.. पुन्हा वायबी सेंटर... बुधवारी बोलावली जम्बो बैठक

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

मुंबईः अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना सोबत घेऊन आज शिंदेंच्या सरकारला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली . यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार वायबी सेंटरमध्ये बुधवारी जम्बो बैठक घेणार असल्याचं सांगितलं. विधीमंडळातील अनेक सदस्य आणि महाराष्ट्रातील पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.

Ajit Pawar
Maharashtra Political Crisis : आषाढी एकादशीच्या दिवशी शिजली सत्तेची साबुदाणा खिचडी; 'इथे' ठरला संपूर्ण प्लॅन

२०१९मध्ये अजित पवारांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता, तेव्हा पवारांनी संपूर्ण ताकद लावत सगळ्यांना माघारी बोलावलं होतं. अजित पवारांचं ते बंड थंड केलं होतं. आता शरद पवार येत्या ५ तारखेला पुन्हा बायबी सेंटरमध्ये बसणार आहे.

जयंत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, अजित पवारांनी नेहमीप्रमाणे आमदारांना एकत्रित करुन मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्तारुढ पक्षाकडे जावून मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली. विधीमंडळ पक्षाचा गटनेता या नात्याने मी सांगतो, विधीमंडळातील सदस्य आणि महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते झालेल्या घटनेचा निषेध करीत आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar NCP : सूत्र पुन्हा झोपले होते! शुक्रवारीच अजित पवारांनी दिला होता विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा

पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकसंघपणाने शरद पवारांच्या सोबत आहेत. टीव्हीवर दिसणाऱ्या सर्वांनी शरद पवारांची भेट घेऊन आम्ही गोंधळलेले होतो, असं म्हटलं आहे. आज झालेल्या घडामोडीला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाहीये.

महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी बुधवारी, ५ तारखेला दुपारी १ वाजता पक्षाच्या बैठकीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत. या बैठकीमध्ये शरद पवार हे स्वतः अधिक स्पष्टपणे भूमिका मांडणार आहेत. विस्कटलेल्या सगळ्यांचं एकत्रिकरण करण्याचं काम करण्यात येणार आहे, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.