Ajit Pawar NCP : महाराष्ट्रच नव्हे तर देशात गाजलेला पहिला बंड शरद पवारांचा

राज्य अन् देशाच्या राजकारणात बंडखोरी नवी नाही.
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPesakal
Updated on

Rebellion in state and country politics : राजकारणात महत्वाकांक्षा, हितसंबंध आणि श्रेष्ठत्व या गोष्टींना महत्व असतं. त्यामुळे राज्यातले किंवा देशातले राजकारण अनेकदा अनपेक्षीत वाटवे असे वळण घेते. एकाचे दोन पक्ष होतात, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेते मंडळी पक्षांतर करतात. सत्तेतील पक्षाला पाडले जाते, तर काहींचे घरवापसीचे ही प्रयोग केले गेले. हे बंडखोरीचे सत्र राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नवे नाही.

देशात आणि राज्यात सर्वात पहिली गाजलेली बंडखोरी ही राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची होती. जाणून घेऊया.

आपल्याच नेत्या विरुद्ध, पक्षा विरुद्ध बंड करून पारंपरिक विरोधकांशी हातमिळवणी करून सत्तेवर येणाऱ्या राजकीय नेत्यांची देशात भलीमोठी यादीच पहायला मिळते. पवारांच्या आधी महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणीबाणीनंतर इंदिरा गांधीविरुद्ध बंड करून बाहेर पडले होते. त्यापैकी काहींनी स्वतःचा पक्षही काढला होता. त्यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदी ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता.

आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यावर तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांच्यासोबत महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस पक्ष काढला. नंतर इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्यावर शरद पवार वगळता बाकी नेते मंडळी काँग्रेसमध्ये पुन्हा दाखल झाले. हे चित्र फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर बघायला मिळत होतं.

Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCP : महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीनंतर राजकीय भूकंपांची माळ

राजकीय बंडाचा इतिहास पाहिला तर सत्तेत प्रथम क्रमांकाची जागा मिळवण्याची महत्वाकांक्षा असणारे, दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्यक्तींकडून किंवा आपल्याला सत्तेतून डावलले जात असल्याची भावना असलेल्या व्यक्तींकडून अशी बंडखोरी होत असल्याचं दिसतं. बऱ्याचदा हे नेत्यांच्या सर्वाधिक जवळ असलेल्या आणि विश्वासू व्यक्तींकडूनच होत असलेले दिसते. यात पंतप्रधान मोरारजी देसाईंची जागा घेणारे चौधरी चणसिंग, पंतप्रधान राजीव गांधींचे जवळचे नेते विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर अशी देशपातळीवरील नावं घेता येतील.

राज्यात लहान मोठे बंड करणारे, नवे पक्ष, विचार मंच काढणाऱ्याची संख्या भरपूर आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी पक्षांतर्गत एक मंच काढला होता. गोविंदराव आदिक यांनीही असाच प्रयत्न केला होता. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदाद पाटील हे कायम राजकीय युद्धाच्या किंवा बंडखोरीच्या पवित्र्यात असतं. आणीबाणीनंतरच्या काँग्रेस पराभवानंतर वसंतदादा यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा अर्स काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांच्या युतीचे सरकार चालवले आणि त्यानंतर शरद पवार यांनी केले.

Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCP News: ''हे होणारच होतं! काहीही करा यंदा भाजपा आपटणारच!'' काँग्रेसचा मोठा दावा

शरद पवार यांची बंडखोरी

महाराष्ट्रातला सबंध देशात गाजलेला पहिला बंड हा शरद पवारांचा होता. त्यांनी १९७८ मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना सत्तेतून घालवून जनता पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने सत्ता हस्तगत केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.