Sharad Pawar : ''हेच योग्य ठिकाण'' पवारांकडून नव्या लढाईची सुरुवात पुन्हा साताऱ्यातून! ऐतिहासिक पावसाने...

Sharad Pawar : ''हेच योग्य ठिकाण'' पवारांकडून नव्या लढाईची सुरुवात पुन्हा साताऱ्यातून! ऐतिहासिक पावसाने...
Updated on

साताराः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कालच त्यांनी यशवंतराव चव्हाण समाधीचं दर्शन घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज स्मृतीस्थळारुन पक्ष बांधणीच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

आज शरद पवार साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भविष्यातील नियोजन आणि पक्षातील घडामोडींवर भाष्य केलं. महत्त्वाचं म्हणजे साताऱ्याविषयी पवार जे बोलले त्यामुळे उपस्थितांनी टाळ्याच पिटल्या. पवार म्हणाले की, साताऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की, काही चुकीचं होतं असेल त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा असला तर सगळ्यात उत्तम ठिकाण सातारा आहे. त्यामुळे इथं मी आलोय. पवारांच्या या विधानाने अनेकांना २०१९मधल्या ऐतिहासिक पावसाची आठवण झाली.

Sharad Pawar : ''हेच योग्य ठिकाण'' पवारांकडून नव्या लढाईची सुरुवात पुन्हा साताऱ्यातून! ऐतिहासिक पावसाने...
Jitendra Awhad: शरद पवार अध्यक्ष मान्य मग त्यांची कारवाई का नाही?; आव्हाडांनी वाचून दाखवले नियम

२०१९ च्या प्रचारदौऱ्यात फडणवीसांनी ठामपणे सांगत राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष संपल्याची विधानं केली होती. परंतु साताऱ्याच्या दौऱ्यात शरद पवार पावसात भिजले आणि वातावरणच बदललं. शरद पवारांना मोठं समर्थन आणि यश मिळालं. शिवाय फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं.

Sharad Pawar : ''हेच योग्य ठिकाण'' पवारांकडून नव्या लढाईची सुरुवात पुन्हा साताऱ्यातून! ऐतिहासिक पावसाने...
Ajit Pawar : ''रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेतली'' अजित पवार पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळेंवर बोलले

त्याच साताऱ्यामधून आज शरद पवार यांनी पुन्हा पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांना ठिकठिकाणी मोठं समर्थन मिळत असल्याचं दिसून येत होतं. महत्त्वाचं म्हणजे तरुणांचं मोठं समर्थन मिळाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत - अजित पवार

दरम्यान, अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राचा भल्यासाठी काम करत राहणार आहोत. जास्त आमदार आमच्यासोबत आहेत.

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय, त्यांच्या पाठीशी उभं राहून राज्याच्या हितासाठी काम करणार आहे. केंद्रात राज्यात वेगळी सरकारे असतील तर निधी कमी मिळतो, आम्हीच राष्ट्रवादी पक्षाच्या हिताचे करतो आहोत. त्यांना नोटिस काढण्याचा अधिकार नसून पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे, असं अजित पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.