महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून भाजप-शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळवलं आहे. महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज (२ जुलै) शपथ घेतली. यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. (Maharashtra Politics)
कोणाला दोष देणार?
शिवसेनेमध्ये फूट पाडताना शिंदे गटाने एक मोठं कारण दिलं होतं, ते म्हणजे अजित पवारांविषयी असलेली नाराजी. अजित पवार कामासाठी निधी देत नाहीत, आणि उद्धव ठाकरे आपल ऐकत नाहीत अशी शिंदे गटाची तक्रार होती. मात्र, आता तेच अजित पवार भाजपसोबत आले असल्यामुळे दानवे यांनी 'आता कोणाला दोष देणार?' असा सवाल शिंदे गटाला विचारला आहे. (Ajit Pawar NCP)
कीव येते
"मला त्या ४० जणांच्या गँगची कीव येते. अगोदरच मंत्री होण्याहून लाथाळ्या होत्या, आता तर मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर..!" अशा आशयाचं ट्विट दानवे यांनी शिंदे गटाला उद्देशून केलं आहे.
ठाकरे-पवारांवर विश्वास
यावेळी दानवे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर विश्वास दाखवला आहे. "उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आव्हान स्वीकारतील आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे पुनश्च घेऊन जातील. लढेंगे भी, जितेंगे भी!" असं दानवे म्हणाले.
सरकार वाचवण्यासाठी खटाटोप
दरम्यान, हा स्टंट म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा उलटफेर झाल्यास सरकार वाचवण्यासाठी असलेला खटाटोप असल्याचं मतही दानवे यांनी व्यक्त केलं. तसंच, या निकालाची भीती भाजपपेक्षा जास्त 'मिंधे' गटालाच असल्याचं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.