Ajit Pawar : 'मी अजित पवार दृढ कथन करतो की....' उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

राज्याच्या राजकारणात आज मोठा राजकीय भुकंप झाला त्याची वेगळी परिणीती समोर आली आहे.
Ajit pawar ncp takes oath deputy chief minister
Ajit pawar ncp takes oath deputy chief minister esakal
Updated on

Ajit pawar ncp takes oath deputy chief minister

राज्याच्या राजकारणात आज मोठा राजकीय भुकंप झाला त्याची वेगळी परिणीती समोर आली आहे. अखेर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना शपथ दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपण गेम चेंजर्स असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरु होती. दादांनी पुन्हा मोठा राजकीय भुकंप केल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

यासगळ्यात एक गोष्ट पुन्हा समोर आली आहे ती म्हणजे जर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर मुख्यमंत्रीपदी कोण असणार याची. हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ९ आमदार शपथ घेतली आहे. त्यामुळे येत्या काही वेळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे बोलले जात आहे.

Ajit pawar ncp takes oath deputy chief minister
Sharad Pawar : शरद पवारांना आधीच होती कुणकुण? त्यामुळेच जाहीर केलेली निवृत्ती, पण...

छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह आणखी काही आमदार शपथविधी घेतला आहे. विशेष म्हणजे काही वेळेपूर्वी शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली होती. त्यात त्यांनी आपल्याला अजित पवारांच्या बैठकीविषयी काहीच माहिती नसल्याचे म्हटले होते.

Ajit pawar ncp takes oath deputy chief minister
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट! सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

दरम्यान, विरोधीपक्ष पवार यांनी देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवारांनी स्विकारावे अशी अग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पुण्यात असलेल्या शरद पवारांनी या बैठकीबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Ajit pawar ncp takes oath deputy chief minister
Maharashtra Politics Live Updates : अजित पवारांची कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी घेतली भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.