Team Ajit Pawar: अजित पवारांची नवी टीम तयार; नियुक्त्यांचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडं सुपूर्द

Team Ajit Pawar: अजित पवारांची नवी टीम तयार; नियुक्त्यांचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडं सुपूर्द

अजित पवारांच्या गटानं पत्रकार परिषद घेत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडानंतर अजित पवारांनी आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये विधीमंडळ नेते, प्रदेशाध्यक्ष, प्रतोद, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला आघाडी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. तसेच या नियुक्त्यांचं पत्र देखील विधानसभा अध्यक्षांकडं देण्यात आलं आहे. (Ajit Pawar new team ready letter of appointment is handed over to Speaker of Legislative Assembly)

Team Ajit Pawar: अजित पवारांची नवी टीम तयार; नियुक्त्यांचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडं सुपूर्द
Jitendra Awhad: विरोधीपक्ष नेतेपदी आव्हाडांची नेमणूक वैध की अवैध? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवार हे विधिमंडळ नेते आहेत. तेच पक्षाच्यावतीनं जबाबदारी सांभाळतील. अनिल पाटील यांनाच प्रतोद ठेवण्याची मागणी मी केली असून याबाबत विधानसभा अध्यक्षांना कळवलं आहे. थोड्याच दिवसांत विधानसभेचं सत्र सुरू होत आहे. (Latest Marathi News)

Team Ajit Pawar: अजित पवारांची नवी टीम तयार; नियुक्त्यांचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडं सुपूर्द
Rupali Chakankar Update : रुपाली चाकणकर कोणाच्या बाजूनं? राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत झालं स्पष्ट

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर सुनील तटकरे म्हणाले, काल आम्ही सरकारमध्ये सामिल झालो. कालच माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. माझ्यावर पुन्हा एकदा नव्यानं जबाबदारी टाकली आहे. पक्षाची ध्येय धोरणं, संघटना मजबूत करण्याचं काम मी करणार आहे.

भुजबळ म्हणाले, "महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भेटायला येत आहेत. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती ही पक्षाच्या कार्यकारिणीनं केली आहे. मात्र, त्यांची बडतर्फी ही कर्यकारीणीनं केलेली नाही. जो काही निर्णय कार्यकारणी घेईल, तो बघता येईल" (Marathi Tajya Batmya)

Team Ajit Pawar: अजित पवारांची नवी टीम तयार; नियुक्त्यांचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडं सुपूर्द
NCP Action: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावरील कारवाईला वेग; सुळेंनी पवारांना लिहिलं पत्र

अजित पवारांच्या गटातील नियुक्त्या अशा

  1. प्रदेशाध्यक्ष - सुनील तटकरे

  2. विधी मंडळ नेते - अजित पवार

  3. प्रतोद - अनिल पाटील

  4. महिला आघाडी अध्यक्ष - रुपाली चकाणकर

  5. राष्ट्रवादी युवक काँग्रेस - सूरज चव्हाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.