धनंजय मुंडेंच्या तब्येतीवर अजित पवारांकडून अपडेट; 'त्या' गोष्टीचा पुर्नउच्चार करत म्हणाले…

Ajit Pawar on Dhananjay Munde Accident gives health update on dhananjay munde after meet in breach candy hospital
Ajit Pawar on Dhananjay Munde Accident gives health update on dhananjay munde after meet in breach candy hospital
Updated on

Ajit Pawar On Dhananjay Munde Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना परळीत काल रात्री झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांनापुढील उपचारांसाठी एअर अँम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन मुंडे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्यतीबद्दल अपडेट दिली.

यावेळी रुग्णालयाबाहेर माध्यामांशी बोलताना आजित पवार यांनी सांगितले की, "काल रात्री अडीच वाजता परळीमध्ये धनंजय यांचा अपघात झाला. डॉक्टरांनी पूर्णपणे तपासणी केलेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना थोडसं फ्रँक्चर झालंय. तरीदेखील आपण 24 तास लक्ष देऊ. ते आता माझ्याशी, तटकरे यांच्याशी बोलले. मी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आहे"

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Ajit Pawar on Dhananjay Munde Accident gives health update on dhananjay munde after meet in breach candy hospital
Jitendra Awhad: आता बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी! आव्हाडांकडून महिलेचा व्हिडीओ शेअर करत धक्कादायक दावा

"त्यांना किती दिवस ठेवायचं हे आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत सांगू असं डॉक्टरांनी सांगितलंय. पण आता त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. काळजीचं काही कारण नाही. पण विश्रांतीची गरज आहे माझी कार्यकर्त्यांना आणि सहकार्याना विनंती आहे की दवाखान्यात येण्यायेवजी ते लवकर बरे व्हावेत म्हणून शुभेच्छा द्याव्यात, प्रार्थना करावी", असे अजित पवार म्हणाले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Ajit Pawar on Dhananjay Munde Accident gives health update on dhananjay munde after meet in breach candy hospital
Sharad Pawar : एकनिष्ठतेचं बाळकडू आईकडूनच! पवारांनी काँग्रेससाठी भावाविरोधात केला होता प्रचार

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले कीस मी परवाच सभागृहामध्ये देखील सांगितलं होतं की रात्री प्रवास करणं सर्वांनीच बंद केलं पाहीजे असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, राजकीय लोक असतील किंवा इतर क्षेत्रातील मान्यवर असतील त्यांनी रात्री अकरा-साडेअकराच्या पुढं ते पहाटे पाच पर्यंत प्रवास न केलेला चांगला असेही अजित पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी क्रिकेटपटू ऋषभ पंत, विनायक मेटे आणि विजयकुमार गोरे यांच्या अपघाताचं उदाहरण देखील त्यांनी दिलं. रस्ते कितीही मोठे, चांगले झाले तरी या गोष्टीचं भान सर्वानी ठेवलं पाहिजे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()