CM शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांशी; अजित पवार म्हणाले, "यांच्यात चढाओढच लागलीय…"

ajit pawar on mangal prabhat lodha cotraversy statement on shivaji maharaj eknath shinde
ajit pawar on mangal prabhat lodha cotraversy statement on shivaji maharaj eknath shinde Sakal
Updated on

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला होता. त्यानंतर आता भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलाना छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले त्या घटनेशी केल्याने नवा वाद पेटला आहे. लोढा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली आहे.

लोढा नेमकं काय म्हणाले?

प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळ्यात बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून बाहेर पडले,” असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

लोढा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांना झापलं आहे. “या वाचाळविरांना आवरा, आवरा असं सातत्याने मी सांगतोय, तरी यांच्या मनात काही कल्पना अशा येतात हे बोलायला एक जातात पण त्यातून अर्थ वेगळाच निघतो. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो हे तर दिसतच नाही. यांच्यात चढाओढच लागली आहे."

ajit pawar on mangal prabhat lodha cotraversy statement on shivaji maharaj eknath shinde
Rabies Disease News : जीवघेण्या रेबीज आजाराबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आता डॉक्टरांना…

"एखाद्याने चूक केली त्यानंतर दुसऱ्याला बोलण्याची संधी मिळाली की दुसरा चूका करतोय. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जवाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि बोललं पाहिजे, याचं भान असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिलं नाही आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी लोढा यांना खडसावले.

ajit pawar on mangal prabhat lodha cotraversy statement on shivaji maharaj eknath shinde
Police Bharti 2022 : मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

यावरून वाद सुरू झाल्यानंतर लोढा यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. मी तर जो प्रसंग घडला याची तुलना केली आहे. माझा केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा प्रयत्न होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()