'हे' दोघेच महाराष्ट्राचे मालक, सगळा भार त्यांच्याच खांद्यावर - अजित पवार

विरोधात असताना एक मागणी करायची आणि सत्तेत असताना एक करायचं असं काम चालू आहे.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकारने राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीलिटर ५ आणि ३ रूपयांनी कमी झाले आहेत. पण राज्य सरकारने खूप कमी प्रमाणात दर कमी केले असून त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा काही परिणाम होणार नाही असं म्हणत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या हे दोनंच मालक आहेत आणि सगळा भार यांच्याच खांद्यावर आहे असा टोला अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांवर लावला आहे.

(Opposition Leader Ajit Pawar On Petrol Diesel Rate)

Ajit Pawar
श्रीलंकेचे राष्ट्रपती सिंगापूरात दाखल; उद्या सौदी अरेबियाला जाण्याची शक्यता

"मी अर्थमंत्री असताना गॅसवरील टॅक्स तेरा टक्क्यावरून ३ टक्क्यावर आणला. त्याच्यात एक हजार कोटी रूपयांचा भार सरकारवर पडला होता. जेव्हा भाजप विरोधीपक्षात होते तेव्हा त्यांनी इंधनावरील टॅक्स ५० टक्क्यावर करण्याची मागणी केली होती मग आता त्यांचे सरकार आल्यावर त्यांनी टॅक्स ५० टक्क्यावर का नाही आणला?" असा सवाल अजित पवारांनी केला आहे. त्यांच्या मागणीनुसार बदल केले असते तर डिझेल ११ आणि पेट्रोल १७ रूपयांनी कमी झाले असते पण त्यांनी हा निर्णय घेतला नाही असं पवार म्हणाले आहेत.

विरोधी पक्षात असताना एक मागणी करायची आणि सत्तेत असताना एक करायचं असं काम सध्या राज्यात सुरू आहे. उद्या केंद्र सरकारकडून भाव वाढवले जातील त्यामुळे परत इंधनाचे दर वाढतील. सध्या राज्य सरकार पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप अजित पवारांनी केला आहे. राज्यात सध्या हे दोघे जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्या खांद्यावर आहे असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
विराट कोहली आजची वनडे खेळणार, नेटप्रॅक्टिस करून चाहत्यांना दिला धक्का

दरम्यान, राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन संचालकांची नियुक्ती केली नाही. सध्या पावसाळा सुरू असताना बऱ्याच दुर्घटना घडत असतात त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला पूर्णवेळ संचालकाची आवश्यकता आहे. अनेक वेळा पूर येतो ढगफुटी होत असते त्यावेळी मदत खात्याला सचिवदेखील महत्त्वाचा असतो पण यांची नियुक्ती करण्यात आलेली नसून या सरकारचे हे अपयश आहे असा आरोप विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

केसरकरांच्या आरोपावर काय म्हणाले अजित पवार?

केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी वक्तव्य करताना उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये. यापूर्वी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने सेना फुटली होती पण ती मंडळ आयोगाच्या कारणाने फुटली होती. पण त्यामागे शरद पवारांचा हात होता हा धादांत खोटा आरोप आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.