Ajit Pawar
Ajit PawarEsakal

Sunil Tatkare: 'जय भीम अल्ला हाफिज..' कार्यकर्त्यांची खदखद व्यक्त करताना तटकरेंच्या भाषणाची अनोखी सांगता

अपमान गिळून अजित दादांनी पक्षाची संघटना मजबूत करण्याचं काम केलंय, सुनिल तटकरेंचं वक्तव्य
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल सुरू झाली आहे. तर पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्या पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यासाठी आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. (Latest Marathi News)

यावेळी बोलताना अजित पवारांना पाठिंबा देणारे नेते सुनील तटकरे यांनी कार्यक्रमामध्ये जमलेल्या आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांनी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला. राजकारणात काही वेळा अशी परिस्थिति निर्माण होते की, कठोर निर्णय घ्यावे लागतात, काही पावले उचलावी लागतात.(Latest Marathi News)

उद्याचं भवितव्य चांगलं करण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात आणि तो निर्णय अजित पवार यांनी घेतला. म्हणून मी तुमचे अभिनंदन आणि आभार मानू इच्छितो असं सुनील तटकरे म्हणालेत.

Ajit Pawar
Ajit Pawar Latest News : अजित पवारांचीच दादागिरी, राष्ट्रवादीचे 'इतके' आमदार त्यांच्या पाठीशी

अजित पवार यांनी गेल्या 25 वर्षात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कधी अजित पवार कोणत्या कार्यक्रमाला ते गेले नाहीत तर त्यांची राष्ट्रीय पातळीवर बातमी होते. हे त्यांच्या कर्तबगारीचे फलित आहे, असं तटकरे म्हणालेत.

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक खदखद होती. धनजंय मुंडे यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. सर्व अपमान गिळून अजित दादा ठामपणे उभे आहेत. देशभरात राज्यात एखाद्या वेळी अस्थिरता निर्माण होते तेव्हा तत्परता दाखवावी लागते आणि तो अजित पवार यांनी दाखवला आहे, अपमान गिळून अजित दादांनी पक्षाची संघटना मजबूत करण्याचं काम केलंय असंही तटकरे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

तर भाषणाच्या शेवटी सुनील तटकरे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज म्हणत आपल्या भाषणाची अनोखी सांगता केली आहे.

Ajit Pawar
Sharad Pawar: अजित पवारांनी शरद पवारांसाठी स्टेजवर खुर्ची रिकामी ठेवली? फोटो व्हायरल..जाणून घ्या सत्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.