NCP Crisis : आजही तुम्हीच आमचे नेते, समजून घ्या; अपात्रतेच्या कारवाईवरून अजितदादा, पटेलांची पवारांना 'ही' गळ

Sharad pawar vs Ajit pawar
Sharad pawar vs Ajit pawarEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी सामना रंगला. दरम्यान काल अचानक अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदारांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतील. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत.

प्रफुल्ल पटेलांची शरद पवारांना गळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी शिंदे-फडणीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर शरद पवार गटाकडून या अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच अपात्रतेची कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे याचिका करण्यात आली. तसेच विधानसभा अध्यक्षांनादेखील याबद्दलचे पत्र देण्यात आले.

यानंतर आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शरद पवारांना गळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमचे नेते आजही तुम्हीच आहात तुम्ही आम्हाला समजून घ्या, ही सर्व आमदारांची भूमिका कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांना ठाऊक नव्हते? अजित पवार गटाला न भेटण्याचा शरद पवार गटाचा निर्णय

काल काय झालं

अजित पवार गटातील आमदार, मंत्री आणि प्रमुख नेत्यांनी रविवारी अचानक शरद पवारांची भेट घेतली होती. कुठलीही पूर्वकल्पना न देता सर्व आमदार नेते वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले होते. यानंतर शरद पवार हे आमचे दैवत असून त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे यांच्यासह सर्व नेते वाय बी चव्हाण सेंटरला आलो होते असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले .

तसेच आम्ही शरद पवारांच्या पाया पडून आम्ही आशिर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली, आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे असी विनंती देखील केली असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.

Sharad pawar vs Ajit pawar
Opposition Meeting : शरद पवारांची विरोधीपक्षांच्या बैठकीला पहिल्या दिवशी दांडी; राऊत म्हणाले…

शरद पवारांचे मात्र मौनच

दरम्यान रविवारी झालेल्या या भेटीनंतर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही असे प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आज पुन्हा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे इत्यादी शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. त्यामुळे शरद पवार अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांना आशिर्वाद देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.