Ajit Pawar: 'मीच उमेदवार आहे असं समजा...', बारामतीत अजित पवारांनी केली लोकसभेच्या लढतीची तयारी

Ajit Pawar: लोकसभेची बारामती मतदारसंघाची आगामी निवडणूक कमालीची चुरशीची होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. तर आज बारामतीत अजित पवारांनी लोकसभेच्या लढतीची तयारी केली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

बारामती : लोकसभेची बारामती मतदारसंघाची आगामी निवडणूक कमालीची चुरशीची होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता अजित पवार यांनीच थेट आपल्या विचाराचा उमेदवार देण्याचे जाहिर केले आहे. मीच उमेदवार आहे असे समजून बारामतीकरांनी मतदान करण्याचे थेट आवाहन अजित पवारांनी आज (रविवारी) बारामतीत केले.

गेले अनेक दिवस ही लुटूपुटीची लढाई आहे, असे अनेक जाणकारांचे मत होते, आज मात्र अजित पवार यांनी लवकरच उमेदवाराचीच घोषणा करण्याचे जाहिर करुन ही खऱी लढाई आहे हेच दाखवून दिले. आजच्या भाषणात नावाचा उल्लेख टाळून शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडत आपण ख-या अर्थाने पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढविणार असल्याचेच संकेत दिले आहेत.

Ajit Pawar
Anganwadi Centers : महाराष्‍ट्रात तब्बल 13 हजार अंगणवाड्यांना केंद्राची मान्यता; मंत्री स्मृती इराणी यांची माहिती

शरद पवार यांचा वरिष्ठ असा उल्लेख करत त्यांनी या पुढील काळात मी केलेल्या विकासकामांची पावती द्यायची असेल तर माझ्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले. हे करताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचाच दाखला देत बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्याच्या योजनांसोबतच पंतप्रधानांकडे आग्रह करुन केंद्राच्याही योजना आणू अशी ग्वाहीच देऊन टाकली. त्या मुळे देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, विकासाच्या प्रक्रीयेत खंड पडून दिला जाणार नाही हाच संदेश अजित पवार यांनी आज बारामतीकरांना दिला.

Ajit Pawar
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात बॉम्ब असल्याच्या फोनमुळे खळबळ, मध्यरात्री ठाणे पोलिसांची पळापळ

बारामतीकर एका गंभीर समस्येतून आगामी काळात जाणार आहात, असा उल्लेख करत एकीकडे अजित पवार सांगतात अस करा, आणि एकीकडे वरिष्ठ सांगतात अस करा, बारामतीकरांनी कुणाच ऐकायच....माझी एवढीच विनंती आहे, इतक्या दिवस वरिष्ठांच ऐकलं...आता माझ ऐका.....इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला, तर नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडे विकासकामे घेऊन जाऊ, त्यांच्याकडून केंद्रातील कामे करुन घेऊ.....यातूनच सुधारणा होतात. नुसते लोकप्रतिनिधी निवडून देऊन चालत नाही, असे कितीतरी आमदार खासदार होतात, अडचणी सोडविणारा खासदार हवा. तुम्हाला भावनिक होऊन चालणार नाही, विकासाचा विचार करा...असा सल्लाच अजित पवारांनी दिला.

Ajit Pawar
Loksabha Election : महाविकास आघाडी 48 जागा लढविणार, 'या' जागा ठरणार निर्णायक; काय म्हणाले आमदार जगताप?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.