Ajit Pawar: "आमचा राजेश..." कार्यकर्त्याला आमदार केल्यानंतर अजित पवारांची 'ती' पोस्ट व्हायरल; आणखी कार्यकर्त्यांना मिळणार आमदारकीची संधी?

Rajesh Vitekar: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून लढण्यासाठी राजेश विटेकर इच्छुक होते. इतकेच नव्हे तर त्यांची उमेदवारीही निश्चित झाली होती. पण ऐनवेळी त्यांची संधी हुकली होती.
Ajit Pawar And Rajesh Vitekar NCP
Ajit Pawar And Rajesh Vitekar NCP
Updated on

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी तर्फे उमेदवारी दिलेले दोन्ही उमेदवार त्यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामधील एक होते राष्ट्रवादीची कार्यालयीन जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे आणि दुसरे परभणीचे राजेश विटेकर.

दरम्यान विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राजेश विटेकर यांनी आज पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी, "आमचा राजेश आमदार झाला असे म्हणत," आनंद व्यक्त केला.

अजित पवारांची पोस्ट होतेय व्हायरल

आज ननिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी येथे भेट घेतली.

या भेटीनंतर एक्सवर पोस्ट करताना अजित पवार म्हटले, "आमचा राजेश आमदार झाला! विधान परिषदेचा आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर राजेश विटेकर याने आज माझी देवगिरी निवासस्थानी येऊन भेट घेतली. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला राजेश विटेकर, वर्षानुवर्ष निष्ठेने आणि अहोरात्र पक्षाचं काम करत आहे. त्याच्या पक्षनिष्ठेच आणि मेहनतीचं फळ प्राप्त झाले. राजेश सारख्या आमच्या असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ निश्चित प्राप्त होईल असा विश्वास पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी व्यक्त करतो. राजेशला भेटून आज आनंद झाला !

Ajit Pawar And Rajesh Vitekar NCP
Sharad Pawar: "शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारेच महाराष्ट्राच्या एकात्मतेला धोका," शरद पवारांचा हल्लाबोल

अजित पवारांनी दिला होता आमदारकीचा शब्द

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून लढण्यासाठी राजेश विटेकर इच्छुक होते. इतकेच नव्हे तर त्यांची उमेदवारीही निश्चित झाली होती. पण ऐनवेळी महायुतीतून ही जागा रासपच्या महादेव जानकरांना द्यावी लागली. त्यानंतर परभणीतील एका सभेत अजित पवारांनी राजेश विटेकरांनी येत्या काही दिवसांत विधीमंडळात संधी दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असे म्हटले आहे.

अखेर विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांनी विटेकरांना आमदार करत आपला शब्द खरा करून दाखवला.

Ajit Pawar And Rajesh Vitekar NCP
Sharad Pawar: " महाराष्ट्रातही निर्माण झाली असती मणिपूरसारखी परिस्थिती पण.. ", शरद पवारांनी सांगितलं कारण

आणखी कार्यकर्त्यांना मिळणार आमदारकीची संधी?

दरम्यान राजेश विटेकर यांचे कौतुक करताना राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ निश्चित मिळेल असे म्हटले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देत विधानसभेत घेऊन जाणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()