Ajit Pawar: अजित पवारांचं शिंदे गटाला झुकतं माप? 'या' आमदाराला तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी, काँग्रेस आमदार आक्रमक

आमदारांना निधी देताना राजकारण झाल्याचा अजित पवारांवर आरोप
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

अर्थमंत्री अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तरीदेखील आम्हाला निधी मिळत नाही, अजित पवार आमच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी देतात, असं म्हणत शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. नाराज शिवसेना आमदारांनी भाजपक्षासोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडल्या.

अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद मिळालं. यामुळे पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेची गोची झाली. मात्र अजित पवारांनी शिंदे गटातील आमदाराच्या मतदारसंघाला तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

Ajit Pawar
Monsoon session: रोहित पवारांचं पावसात एकला चलो रे! विधानभवनातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एकटेच बसले आंदोलनाला

रायगडच्या महाड मतदारसंघाला अर्थमंत्री अजित पवारांनी तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहीती आहे. भरत गोगावले यांचा हा मतदारसंघ आहे. २ जुलैला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये आपल्या मतदारसंघाला १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या माहितीला भरत गोगावले यांनी दुजोरा दिला आहे.

गोगावलेंनंतर राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांच्या मतदारसंघालादेखील अजित पवारांनी भरघोस निधी मिळाला आहे. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी अजित पवारांनी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मतदारसंघाला चांगला निधी मिळाल्यामुळे आमदार भरत गोगावलेंनी आनंद व्यक्त केला.

Ajit Pawar
Scholarship : राज्यातील पहिली ते आठवीचे लाखो अल्पसंख्याक विद्यार्थी वंचित

आमदारांना निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप

आमदारांना निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर करण्यात आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना निधी वाटपामध्ये झुकतं माप दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अजित पवारांसोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरभरुन निधी देण्यात आलाय. त्याचवेळी शिंदे गटालाही खूश करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Ajit Pawar
Monsoon session: रोहित पवारांचं पावसात एकला चलो रे! विधानभवनातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एकटेच बसले आंदोलनाला

आमदारांना निधी वाटपात राजकारण झाल्याचा आरोपावर अजित पवारांचं स्पष्टीकरण

निधी वाटपात कोणावरही अन्याय झालेला नाही. सर्व आमदारांना समसमान निधी वाटप झालं आहे, विरोधक आरोप करतायत, पण त्यात तथ्य नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.