Ajit Pawar: अखेर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळालीच! नार्वेकरांनी काढलं स्टिकर अन् चर्चेला उधाण..

NCP Ajit Pawar: मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाचे स्टीकर काढल्यानंतर अजित पवार त्या खुर्चीवर बसले
 NCP Ajit Pawar News
NCP Ajit Pawar NewsEsakal
Updated on

Ajit Pawar News: मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या इमारतीचे भुमीपूजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिकामी खुर्ची पाहुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना बोलावलं आणि त्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. या विनंतीची मान ठेवत अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या रिकाम्या खुर्चीवर बसले.

मात्र त्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर लावलेला त्यांच्या नावाचा स्टीकर काढला, त्यानंतरच अजित पवार त्या खुर्चीवर बसले. मात्र हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळात मिश्कील चर्चा रंगली आहे.

 NCP Ajit Pawar News
Nagpur Crime News: नागपूर पुन्हा हादरलं! सेन्ट्रल जेलमध्ये गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार अन् मारहाण

नेमकं काय झालं?

मनोरा आमदार निवास इमारतीचे भूमिपूजन आज झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्यांच्यासाठी असलेल्या खुर्चीवर राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांना बसण्याची विनंती केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाचे स्टीकर काढल्यानंतर अजित पवार त्या खुर्चीवर बसले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रीया

यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. 'मला असं वाटतं त्यांच्याकडे सर्व निर्णय आहेत, त्यांच्या मनात काही असू शकतं', अशी मिश्किल प्रतिक्रीया दानवेंनी दिली आहे.

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

या प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं कि, 'या सर्व निरर्थक चर्चांना प्रोत्साहन देऊ नये, राज्यासाठी गौरवशाली कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री व्यक्तीगत अडचणीमुळे येऊ शकले नाहीत” असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे.

 NCP Ajit Pawar News
Sambhaji Bhide Controversy: भिडेंच्या अडचणी वाढणार? 8 दिवसात हजर राहण्यासाठी पोलिसांची नोटीस, ऑडिओची होणार फॉरेन्सिक तपासणी

तर काही दिवसांपुर्वी राज्याच्या राजकारणात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर राज्यातील काही ठिकाणी यासंबधीचे बॅनर लागले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत, आणि तेच राहतील असं म्हटलं होतं. त्यानंतर चर्चेला पुर्णविराम मिळाला होता, पंरतु आता पुन्हा एकदा या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

 NCP Ajit Pawar News
Nitin Desai Death: नितीन देसाई यांचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टमचा अहवाल आला समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()