Ajit Pawar: ...तर भुजबळांनी सरकार टिकवलं असतं, उद्धव ठाकरेंना उद्देशून अजित पवारांचा दावा

Ajit pawar says Uddhav Thackeray should have sought help of Chhagan Bhujbal maharashtra Politics
Ajit pawar says Uddhav Thackeray should have sought help of Chhagan Bhujbal maharashtra Politics
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली, यानंतर शिवसेना कुणाची हा वाद देखील पेटल्याचं पाहायला मिळालं दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांनी गेलेलं सरकार वाचवल्याचा एक किस्सा सांगत, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी छगन भुजबळांशी संपर्क करायला हवा होता असं म्हटलं आहे. पवार हे छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

शिवसेनेचे १५ आमदार पक्षातून बाहेर पडल्यावर उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ (राष्ट्रवादीचे नेते) यांची मदत घ्यायला हवी होती असे अजित पवार म्हणाले. छगन भुजबळ हे अशा परिस्थितीचे मास्टर आहेत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता, तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिसला असतात असे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Ajit pawar says Uddhav Thackeray should have sought help of Chhagan Bhujbal maharashtra Politics
Viral Video: मुख्यमंत्र्यांनी PM मोदींच्या शेजारी बसूनच खिशातून काढली पुडी अन्...

"उद्धव ठाकरेसाहेब तुम्ही १५ लोकं गेली तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं असतंना तर तुम्ही मुख्यमंत्री दिसला असतात" असे अजित पवार म्हणाले, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, 'ठोशास ठोसा कसा द्यायचा त्याचं मुर्तीमंत उदाहरण भुजबळ साहेब आहेत" असे अजित पवार म्हणाले.

एकदा असात प्रसंग आला सरकार जायचं, विलासराव देशमुख मला, जयंत पाटील अशा आम्हा सगळ्यांना म्हणाले जाऊद्या आता देऊ सोडून, आता सरकार टिकतं नाही. पण भुजबळ म्हणाले अजिबात नाही, सरकार टिकेल आणि ते कामाला लागले आणि त्यांनी जवळपास गेलेलं सरकार त्यांनी पुन्हा आणलं असे अजित पवार म्हणाले.

Ajit pawar says Uddhav Thackeray should have sought help of Chhagan Bhujbal maharashtra Politics
Andheri Byelection: अजूनही वेळ गेलेली नाहीये! मोठं मन दाखवून निवडणूक बिनविरोध करा; ठाकरे गटाचं आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.