Baramati : पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग! अजित पवारांच्या मदतीने बारामतीत 'अमेठी पॅटर्न'?

Supriya Sule and Ajit Pawar
Supriya Sule and Ajit Pawar
Updated on

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पक्षात पुतण्या अजित पवार यांनी बंड केल्याने उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्यावर बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदार संघ राखण्याचे खडतर आव्हान उभे ठाकले आहे.

Supriya Sule and Ajit Pawar
Tomato Price Hike : चिंता नसावी! टोमॅटोचे दर लवकरच कमी होणार; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

अजित पवार भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यातच अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीत पुरंदर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. पुरंदर तालुका बारामती लोकसभा मतदार संघातील प्रमुख विधानसभा मतदार संघ आहे. बारामतीतून शरद पवार देखील खासदार होते. आता त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे येथून खासदार आहे.

Supriya Sule and Ajit Pawar
Jitendra Awhad NCP: जितेंद्र आव्हाडांचा अजूनही विरोधी पक्षनेतेपदावर दावा! म्हणाले, "आमच्याकडे ४५ आमदार"

मागील अनेक दिवसांपासून भाजपने बारामती जिंकण्यासाठी फिल्डींग लावली आहे. बारमती मतदार संघाअंतर्गत सहा विधानसभा मतदार संघ येतात. यापैकी दौंड मतदार संघातून भाजप पुरस्कृत राहुल कुल, बारामतीतून खुद्द अजित पवार आमदार आहेत. याशिवाय इंदापूरमधून अजित पवार समर्थक दत्ता भरणे आमदार आहेत. भोर मतदार संघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि पुरंदरमधून संजय जगताप आमदार आहेत.

एकंदरीतच बारमती मतदार संघात काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समान प्रभाव आहे. मात्र येथून सुप्रिया सुळेच खासदार म्हणून निवडून येतात. सुप्रिया सुळेंबाबत काँग्रेसचीही भूमिका कायम अनुकूल राहिली आहे.

अमेठी पॅटर्न राबवणार

आता बदलेल्या परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आणि भाजप एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे किती नेत्यांना एकत्र आणू शकतील, हे महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय शरद पवार गटाचा एकही आमदार आता बारामती मतदार संघात नाही. शिवाय अजित पवार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची ताकद पाहता, बारामती शरद पवारांच्या हातून निघून गेल्यास नवल वाटणार नाही. अर्थात काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला अमेठी मतदारसंघ भाजपने अशाच पद्धतीने जिंकला होता.

दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदार संघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आव्हान देणार, अशी चर्चा सुरू आहे. मात्र रोहित पवार यांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.