अजित पवार नाराज होवून काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? मनसे नेत्याचा गौप्यस्फोट

अजित पवारांचं अद्याप मौन
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पडद्या मागे अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान राजकारणात अनपेक्षित राजकीय घडामोडी देखील समोर येत आहेत. राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबिराला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असताना सहभागी झाले.

Ajit Pawar
Investment Tips : तुमच्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक कशी कराल ; जाणून घ्या कुठे मिळेल बेस्ट रिटर्न्स

परंतु त्याचवेळी या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर असल्याचे दिसून आले. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आली. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी अद्याप या मुद्दावर मौन बाळगलं आहे. त्यामुळे अजित दादा नाराज आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे. मिटकरी यांनी ट्विट करून राज ठाकरेंना विचारलं होतं "सन्मा. राज साहेब ठाकरे यांनी "हर हर महादेव " या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले अशी चर्चा आहे कदाचित म्हणुन काहिकांचा इतका आकांड तांडव सुरु नसेल ना? राज साहेबांनी खुलासा करावा. आपण शिवप्रेमी आहात म्हणुन विचारतोय" या ट्विटला उत्तर ट्विटनं देत त्यांनी अजित पवार नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काळेंनी ट्विटमध्ये म्हणटलं आहे की "मिटकरी राजसाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारण्या अगोदर अजितदादा हे पवारसाहेबांवर नाराज होवून काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का ? याचा खुलासा करावा..अजितदादांनी कंपू बदलला तर पळता भुई थोडी होईल तुमची" यावर आजून तरी राष्ट्रवादीने कोणता खुलासा केला नाही. मात्र अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा मात्रा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.