Ajit Pawar : ''पक्षाला शिस्त लावायची गरज आहे, दादांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं'', राष्ट्रवादीच्या आमदाराचं मोठं विधान

amol mitkari on ajit pawar
amol mitkari on ajit pawaresakal
Updated on

मुंबईः नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने पक्षाला शिस्त लावण्याची गरज असून दादांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं, असं विधान केलं आहे.

२१ जून रोजी अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार बोलतांना म्हणाले होते की, मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काहीही रस नव्हता. आमदारांनी आग्रह केला, सह्या केल्या त्यामुळे मी विरोधी पक्षनेता झालो. आता एक वर्ष झालं मी काम करत आहे. काहींचं म्हणणं आहे तू कडक वागत नाही.. मग आता काय ह्यांची गचुरी धरु काय? असं म्हणून अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या भूमिकांना होत असलेला विरोध बोलून दाखवला. तसेच, मला विरोधी पक्षनेते पदामध्ये रस नव्हताच. त्यामुळे आता मला संघटनेत पद द्या. कुठलंही पद द्या, त्याला मी न्याय देतो, असं पवार म्हणालेले.

amol mitkari on ajit pawar
Building Collapse : नानावटी 'हॉस्पिटल'जवळची इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, चौघांना ढिगाऱ्याखालून काढले

पक्षाला शिस्त लावण्याची गरज- मिटकरी

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी 'टीव्ही९'शी बोलतांना म्हणाले की, अजितदादांनी इच्छा व्यक्त करणं रास्त आहे. परंतु अंतिम निर्णय पवार साहेब घेत असतात. मला वाटतं की दादांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं आणि मुख्यमंत्रीही व्हावं

पक्षाचा शिस्त लावायची गरज आहे. त्यावर पक्षात शिस्त नाही का? असा प्रश्न मिटकरींना विचारण्यात आला. ते म्हणाले की, शिस्त आहे पण आणखी शिस्त लावण्याची गरज आहे.

amol mitkari on ajit pawar
गोफण | मम्मी मेरी शादी कर दो Gofan

पंकजा मुंडेंबद्दल अमोल मिटकरी म्हणाले...

खडसे साहेब पंकजा मुंडेंना भेटायला गेले होते. तेव्हापासून बघत आहोत त्यांना भाजपकडून वारंवार चुकीची वागणून दिली जात आहे. वैद्यनाथ कारखान्याच्या निमित्ताने दोघे बहीण-भाऊ एकत्र आले होते. त्यामुळे त्या राष्ट्रवादीत याव्यात असं मला वाटतं. बीआरएस अफुची गोळी आहे. हे गुलाबी वादळ असून पंकजा मुंडे तिकडे जाणार नाहीत. पंकजाताई थोड्यात दिवसात राष्ट्रवादीमध्ये येतील हे चंद्रशेखर बावनकुळे यांनाही माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.