भाजपचे आमदार नितेश राणे हे सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नितेश राणे यांच्या अशाच एका वक्तव्याने आता वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्वाबाबत आक्रमक पवित्रा घेतलेल्या नितीश राणे यांनी गणपती मंडळाच्या भेटीदरम्यान हिंदूंशिवाय कोणाशीही व्यवहार करू नये शपथ दिली.
एवढेच नाही तर ‘हिरव्या सापांना खाऊ घालू नका, ते कधीच तुमचे होणार नाहीत’, असे म्हणत मुस्लिम धर्मियांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र, महायुतीतच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.