राज्यात लॉकडाऊनचे संकेत, अजित पवारांचं साताऱ्यात मोठं विधान

Lockdown Updates in Maharashtra
Lockdown Updates in MaharashtraSakal
Updated on

राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. मुंबई-पुण्यात पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत या नियमावलीवर विचार करण्यात आला. यानंतर साताऱ्यातील दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Corona in Maharashtra)

राज्यातील 10 मंत्री आणि जवळपास 20 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार (Ajit Pawar on Corona)यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आज साताऱ्यात त्यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागात केली जाईल,' असं उपमुख्यमंत्री म्हणाले. (Night Curfew in Maharashtra)

पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन केलंय देशातील अनेक राज्यांत सध्या रात्रीची संचारबंदी सुरू आहे. दिल्ली, बंगळुरुतही त्याची काटेकोट अंमलबजावणी होत आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस आपण मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळं या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,' असं अजित पवार म्हणाले. (Lockdown Updates in Maharashtra)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.