Ajit Pawar : माझ्या वक्तव्यामुळे मविआमध्ये अडचणी निर्माण होतील...अजित पवार असं का म्हणाले?

चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ( ajit pawar news in Marathi)

अजित पवार म्हणाले की, आताच्या पाच विधान परिषदेत मोठा झटका बसला आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही आव आणला तरी येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून येईल हे त्यांनाही माहिती आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही त्यांना झटका बसण्याची भावना त्यांच्या मनामध्ये आली आहे. निवडणूक म्हंटली की कोणाचा तरी विजय होतो, कोणाचा तरी पराभव होतो. अपयशाने खचायाचं पण नसतं आणि यशाने हुरळून पण जायचं नसत असंही अजित पवार म्हणाले आहेत.

तर सत्यजित तांबे यांच्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न केला की, सत्यजित तांबेंच्या घरातील वाद अजित पवारांनी लावला असं म्हंटलं जात आहे त्यावर अजित पवार म्हणाले की, माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे आमच्या महाविकास आघाडीमध्ये अडचणी निर्माण होतील असं मी कोणतही वक्तव्य करणार नाही. तुम्ही नाना पटोले यांचं नाव सांगून कितीही प्रश्न विचारले तरी आम्ही वरिष्ठ बंद खोलीत चर्चा करू तुम्ही ते डोक्यातून काढा असा सल्लाच अजित पवारांनी पत्रकारांना दिला आहे.

Ajit Pawar
Kasba Bypoll Election : पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ची पोटनिवडणुकीसाठी तयारी; इच्छुकांच्या मुलाखती सुरू

तर कसबा पोटनिवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे. ते म्हणाले की कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचं काही कारण नाही. भाजपने कोल्हापूर, आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नाही. त्याचबरोबर देगलूरची निवडणुकही बिनविरोध झाली नाही. एक मुंबईची निवडणूक बिनविरोध झाली. बाकीच्या पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढाव. शेवटी लोकशाही आहे. जनतेला हवं त्याला ते निवडून देतील. असं अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar : चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले निवडणूक बिनविरोध....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.