Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत का केलं बंड? 'हे' आहे कारण? | Maharashtra Politics

Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी आपल्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून शिंदे भाजप सरकारमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Maharashtra Politics
Video Viral : भाजपच्या कार्यक्रमात राडा! गरिबांना वाटपासाठी आणलेल्या पेट्या लोकांनी पळवल्या

दरम्यान, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तर ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात असं सांगण्यात येत होतं. अजित पवार यांनी मला पक्षाची जबाबदारी द्या, विरोधीपक्षनेते पदावरून मला मुक्त करा असं राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितलं होतं.

त्यासाठी अजित पवारांनी १ जुलै पर्यंत अल्टीमेटम दिला होता. पण पक्षाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे अजित पवार नाराज होते. या सगळ्या घडामोडीनंतर ते आता फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.

दरम्यान, पटना येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांनी जायला नको होतं अशी इच्छा अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांची होती. पण शरद पवार हे या बैठकीला हजर राहिल्यामुळे आमदार नाराज होते असंही सांगण्यात येतंय.

अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा असून त्यांच्यातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वांत मोठी अपडेट आहे. तर या शपथविधी सोहळ्याला शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics
मॉलच्या टॉयलेटमध्ये घुसले दरोडेखोर; बंदुकीचा धाक दाखवून बूट चोरले, CCTV Footage Viral

आज शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची यादी

  • अजित पवार

  • छगन भुजबळ

  • दिलीप वळसे पाटील

  • धनंजय मुंडे

  • हसन मुश्रीफ

  • अनिल भाईदास पाटील

  • आदिती तटकरे

  • संजय बनसोडे

  • बाबूराव अत्राम

अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार

दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
किरण लहमाटे
सरोज अहिरे
अशोक पवार
अनिल पाटील
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी दौलत दरोडा
अनुल बेणके
रामराजे निंबाळकर
धनंजय मुंडे
निलेश लंके
मकरंद पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.