पुणेः अजित पवारांनी सत्तापक्षाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यासोबत अलेल्या ९ आमदारांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात खातेवाटप करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये सर्वात जास्त फटका मंत्री गिरीश महाजन यांना बसला होता.
अजित पवार गटाला खातेवाटप करताना भाजपकडची सहा खाती आणि शिंदे गटाकडील तीन खाती अशी ९ खाती पवार गटाला देण्यात आलेली होती. गिरीश महाजन यांच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात तीन महत्त्वाची खाती होती. त्यांच्याकडीन दोन खाती काढून घेण्यात आली होती.
गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि तिसरं क्रीडा आणि युवक कल्याण; अशी तीन खाती होती. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांची दोन खाती अजित पवार गटाला देण्यात आली.
महाजन यांच्याकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण हे खातं हसन मुश्रीफ यांना मिळालं तर क्रीडा व युवक कल्याण हे खातं मंत्री संजय बनसोडे यांना देण्यात आलं. तर गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज खातं उरलं.
याच मुद्द्यावरुन काल पुण्यात गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर खंत माडंली. क्रीडा पुरस्काराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडे क्रीडा खात्याचा कारभार होता. एकनाथ शिंदे यांनी मला क्रीडा मंत्री केलं होतं. राज्यात अनेकांना आनंद झाला कारण एका खेळाडूकडे हे खातं सोपवण्यात आलं होतं. पण दादा (अजित पवार) आपल्याकडे आले. त्यांनी माझं खातं काढून घेतलं. त्याचं कारण मी आता सांगत नाही ते मला आणि दादांना माहिती आहे. असं म्हणत त्यांनी एकप्रकारे तक्रारच केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.