Maharashtra Politics:राष्ट्रवादीच्या व्हीपबद्दल नार्वेकरांचा मोठा खुलासा; म्हणाले,"नेतृत्वाच्या इच्छेनुसार..

Rahul Narvekar on Whip: राष्ट्रावादीमध्ये व्हीप कुणाचा लागू होणार याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपले मत व्यक्त केले.
Sharad pawar vs Ajit pawar
Sharad pawar vs Ajit pawarEsakal
Updated on

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षात अस्थिरता निर्माण झाली. महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदेंच्या बंडातून सावरलीच होती, तेव्हाच अजित पवार यांनी त्यांच्या ८ सहकारी आमदारांसह शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली.

ज्यानंतर जयंत पाटील यांच्याकडून पवारांहस ८ आमदारांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे पाठवण्यात आला. अजित पवारांनी पक्षावर दावा केल्यानंतर व्हीप कुणाचा लागू होणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वक्तव्य केले आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Ajit Pawar Latest News: अजित पवारांनी वाढवलं भाजपच्या दिग्गज नेत्यांचे टेन्शन; नव्या समीकरणाने नेते चिंतेत

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप नेमण्यात आले आहेत. अजित पवार यांच्याकडून व्हीप म्हणून अनिल भाईदास पाटील यांच्या नावाची घोषणा केली, तर जयंत पाटील यांनी व्हीप म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, व्हीप कुणाचा लागू होणार यासंदर्भात राहुल नार्वेकरांना माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला.

माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले की, "सुप्रिम कोर्टाने जो आदेश दिला आहे, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलयं की राजकीय पक्षांच्या भूमिकेनुसारचं व्हीप नेमणं अपेक्षित आहे. राजकीय पक्षाचे नेतृत्व कोण करत, त्यांची इच्छा व्हीप संदर्भात काय आहे? त्यांनी घेतलेला निर्णय पक्षाच्या संविधानाला अनुसरुन आहे का ? या सर्वांची खात्री केल्यानंतर व्हीप संदर्भात मी निर्णय देईल."

Sharad pawar vs Ajit pawar
Ajit Pawar : ऑफिस मिळाले पण चावी सापडेना! अजित पवार गटाची A-5 बंगल्यावरून झाली गोची

याआधी सुनिल प्रभू यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकर घ्यावा याबद्दल सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती.

यावर बोलताना नार्वेकर म्हणाले की, "सुप्रिम कोर्टात याचिका करुन आपली बाजू मांडण तुमच्या आमच्या प्रत्येक भारतीयचा अधिकार आहे. त्याच्यावर मी किंवा कुणी रोक टाकू शकत नाही. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार रिजनेबल वेळेत निर्णय घेऊ. निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची दिंरगाई किंवा कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, ज्यातून मिस्कॅरेज ऑफ जस्टिस होईल."

Sharad pawar vs Ajit pawar
Maharashtra Politics : अजित दादांसोबत असलेले आमदार मकरंद पाटील शरद पवारांच्या गाडीत

आता राहूल नार्वेकर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या व्हीप संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे लक्ष लागून आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Ajit Pawar Latest News : शरद पवारांवर गुगली? काल पाठिंबा देणारा आमदार आज देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या भेटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.