राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच दोन गटांमध्ये चालू असलेल्या कलगीतुऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट सरकारमध्ये सहभागी झाला असून एक गट अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहे. किती आमदारांचा पाठिंबा आपल्याला आहे या पार्श्वभूमीवर काल मुंबईत दोन्ही गटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)
या अजित पवार गटाच्या बैठकीत नेतेमंडळींनी शरद पवारांना आणि त्यांच्या काही निर्णयांना लक्ष्य करताना आपापल्या भूमिका मांडल्या. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांना आता वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं असं म्हणतं राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. तर अजित पवारांनी शरद पवारांना दिलेल्या सल्ल्यावर जेष्ठ नेते छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना यावर प्रश्न विचारण्यात आला.(Latest Marathi News)
शरद पवारांना काल निवृत्तीचा सल्ला दिला आता तुमचंही वय आता ७५ च्या आसपास आहे, तर ही तुमची शेवटची निवडणूक असणार का? यांच्यापुढे तुम्ही निवडणूक लढणार का?, यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की,'म्हणूनच मी आता सुद्धा प्रांताध्यक्ष पद नाकारलं आहे, १९९९ साली मला प्रांताध्यक्ष पद दिलं होतं, चार महिने प्रांताध्यक्ष होतो मी. आता प्रांताध्यक्ष असतील अध्यक्ष असतील यांची काम मोठी आहेत. देशभर, राज्यभर फिरायचं आहे. संघटना बांधायची आहे.(Latest Marathi News)
बाकी मंत्र्याची जी काही काम असतात, बोलावलं तर जायचं आहे. काही ठिकाणी भाषण करायची आहेत आणि हे मी करत आहे. शरद पवार यांच्यासोबत असताना प्रमुख वक्ता म्हणुन जायचो. यापुढे पक्षाने सागितलं तर बोलावलं की जायचं. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी सांगितलं भुजबळ तुम्ही थांबा तर मी थांबेन असं भुजबळ म्हणाले आहे.(Latest Marathi News)
पक्ष सांगेल ती कामे करेन आणि पक्ष सांगेल तेव्हा थांबेल असं स्पष्टपणे छगन भुजबळ बोलताना म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.