Ajit Pawar : कुणीही अर्थमंत्री बनला, तरी काम करण्याची क्षमता ठेवावी; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

ajit pawar and Ekanth shinde
ajit pawar and Ekanth shinde
Updated on

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्ष सामील झाला आहे. शिवाय अजित पवार यांच्यासह ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र या नेत्यांना खात्यावाटप झालेलं नाही. आता या खातेवाटपावरून मतभेद होताना दिसत आहे. त्यातच अजित पवार यांना अर्थमंत्री खातं देऊ नये, असा मतप्रवाह शिंदे गटात आहे. मात्र शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत वेगळी भूमिका घेतली आहे.

ajit pawar and Ekanth shinde
Rupali Chakankar : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण...; शिंदे गटाच्या आमदाराची चाकणकरांनी काढली खरडपट्टी

अर्थ खातं हे अजित पवारांना मिळू नये, असं आमदारांचं मत असल्याचं अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, नेते जे निर्णय घेतात, ते अॅक्सेप्ट करायचं असतं. कुणीही अर्थमंत्री बनला, तरी आपण काम करण्याची क्षमता ठेवावी. आपल्याला पण लोकांनी निवडून दिलं आहे. आपण पण आमदार आहोत. आपलं काम कसं नाही होणार? आपण आपलं काम करत राहायचं, असंही ते म्हणाले.

ajit pawar and Ekanth shinde
ST Bank : एसटी बँकेच्या शाखामध्ये अखंड भारताचा नकाशा आणि गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांचे फोटो

मंत्रीमंडळाच्या विस्तारावर पाटील म्हणाले की, घोडं कुठंच अडलं नाही. घोडं सरळ चालत आहे. तीन वाटेकरी असल्याने संसारासारखंच आहे. त्यामुळे उणिवा राहणार आहे. मात्र निश्चितपणे एक दोन दिवसांत विस्तार होईल, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी आपण केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे सरकारमधून बाहेर पडल्याचं म्हटलं होतं. तसेच अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, असे आरोपीही करण्यात आले होते. मात्र आता अजित पवारच सरकारमध्ये सामील झाले असून अर्थखातं पुन्हा त्यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. यावरून शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.