Ajit Pawar: "तीन-चार महिन्यांत अजित पवार जेलमध्ये दिसतील"; शालिनीताई पाटलांचा घणाघात, हायकोर्टात दाखल करणार याचिका

राज्याच्या मुख्य सचिवांना याचिकेत प्रतिवादी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Shalinitai Patil_Ajit Pawar
Shalinitai Patil_Ajit Pawar
Updated on

नवी दिल्ली : राज्यातील ज्येष्ठ राजकारणी आणि दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांबाबत मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे येत्या ३-४ महिन्यात तुरुंगात दिसतील असा दावा त्यांनी केला आहे. यासाठी हायकोर्टात आपण तीन अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Ajit Pawar will be seen in jail says Shalinitai Patil and will file three petitions in Mumbai High Court)

Shalinitai Patil_Ajit Pawar
'Dunki’ Flight: 'डंकी'चा संशय! फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान 276 प्रवाशांसह मुंबईत लँड; इतर 24 जणांचं काय?

अजित पवारांना निवडणुका लढवता येणार नाही

शालिनीताई म्हणाल्या, २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका आहेत. या निवडणुका त्यांना लढवता येणार नाहीत, कारण त्यावेळेला ते जेलमध्ये असतील. पुढच्या दहा दिवसांत मी त्यांच्याविरोधात ३ अर्ज हायकोर्टात दाखल करणार आहे.

हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, अजित पवार हे २५,००० कोटींच्या शिखर बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आहेत. त्यांच्यावर एफआयआर दाखल करा असं कोर्टानं सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पण कारवाई काहीच झाली नाही, पाच वर्षे झाली फुकट गेली. (Latest Marathi News)

Shalinitai Patil_Ajit Pawar
Shivrayancha Chhava: 'शिवरायांचा छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर, कोण साकारणार छत्रपती संभाजी महाराज?

मुख्य सचिवांना करणार प्रतिवादी

त्यामुळं याचिकेत आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांकडं पहिली मागणी करणार की आम्ही एफआयआर दाखल केला आहे, त्यामुळं त्यांच्यावर ताबडतोब आरोपपत्र दाखल करावं आणि अजित पवारांना कोर्टासमोर उभं करावं. पाच वर्षे फुकट गेल्यामुळं आम्ही फास्टट्रॅकमध्ये खटला चालवण्याची विनंती कोर्टाला करणार आहोत. (Marathi Tajya Batmya)

Shalinitai Patil_Ajit Pawar
'Dunki’ Flight: 'डंकी'चा संशय! फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान 276 प्रवाशांसह मुंबईत लँड; इतर 24 जणांचं काय?

मोदींवर विश्वास राहिलेला नाही

दुसरं म्हणजे माझ्या संस्थेची प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे. ती प्रॉपर्टी आम्हाला द्यावी, ती आमचं आम्ही चालवतो. पण ईडी देखील भारत सरकारच्या ताब्यातील संस्था असल्यानं मला मोदींवर विश्वास राहिलेला नाही.

Shalinitai Patil_Ajit Pawar
Loksabha Election: ठाकरे गट मावळची जागा लढविणार? लोकसभा निवडणुकीसाठी ‘मातोश्री’वरील आढावा बैठकीत चर्चा

शिंदे-फडणवीसांचं चांगलं सुरु होतं पण...

शिंदे-फडणवीसांचं सरकार चांगलं सुरु होतं, काही कमी नव्हतं. पण त्यांनी पक्ष फोडायची सुपारी देऊन अजित पवारांना सरकारमध्ये आणलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री केलं. सुपारीचं राजकारण आम्हाला पसंद नाही. हे उपमुख्यमंत्री काय योग्यतेची व्यक्ती आहे, हे सर्वांना माहिती, असंही यावेळी शालिनीताई यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.