Ajit Pawar: राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली! पक्षातील खासदार, आमदार पवारांच्या बंगल्यावर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता
Ajit pawar
Ajit pawar sakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमावेळी पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पद देण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु झाली आहे. आता प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं बोलून दाखवलं होतं. त्याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे आमदार, जेष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष देवगिरीवर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ देखील देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित आहेत.(Latest Marathi News)

Ajit pawar
Supriya Sule: पहाटेचा शपथविधी होणार हे माहित होतं का? सुप्रिया सुळे म्हणाल्या,'तेव्हा मी...'

अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद द्यावे म्हणून हे आमदार लॉबिंग करत असल्याचं सांगितलं बोललं जातं आहे. या बैठकीत पक्षातील संघटनात्मक बदलावरही चर्चा सुरू असल्याची चर्चा असल्याची माहीती आहे.(Latest Marathi News)

या बैठकीत काय निर्णय होतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजितदादांशी बोलल्यानंतर हे नेते शरद पवार यांचीही भेट घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तर जयंत पाटील यांनी आपल्या पदाची पाच वर्ष दोन महिने इतका काळ पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यघटनेनुसार एका व्यक्तीला एका पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. त्यामुळेच आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा राष्ट्रवादीमध्ये सुरु आहे.(Latest Marathi News)

Ajit pawar
Buldhana Bus Accident : बुलढाण्यातील भीषण बस अपघातानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.