युतीत पुन्हा वाद! बुलडाण्याचा पालकमंत्री राष्ट्रवादीचा होऊ देणार नाही; संजय गायकवाड आक्रमक

Rajendra Shingne And Sanjay Gaikawad
Rajendra Shingne And Sanjay Gaikawad
Updated on

मुंबई - राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकलेला नाही. मात्र विस्तार होण्याआधीच अनेक आमदार मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र संभाव्य मंत्रीपद आणि पाकलमंत्रीपदावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आक्रमक झाले आहे. बुलडाणा जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ देणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

Rajendra Shingne And Sanjay Gaikawad
Devendra Fadnavis : अजितदादा एकटेच दिल्लीला गेले, म्हणजे फडणवीस 'साईडलाईन'; अंधारेंचा टोला

संजय गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या उठावात सहभागी होताना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर आरोप केले होते. पालकमंत्री निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोप त्यावेळी गायकवाडांनी केला होता.

Rajendra Shingne And Sanjay Gaikawad
CM Shinde News : 'त्यांनी हसतमुखाने दुसरा उपमुख्यमंत्री देखील स्वीकारला…'; CM शिंदेंकडून फडणवीसांच्या मोठेपणाचं तोंडभरून कौतुक

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे अजित पवारांच्या गोटात सामील झाले आहेत. पुढील मंत्रीमंडळ विस्तारात "डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मंत्रिपद मिळाले आणि त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले तर तुम्हाला ते मान्य असेल का?" असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांना विचारण्यात आला.

यावर संजय गायकवाड म्हणाले की, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री होऊ देणार नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे २ आणि भाजपचे ३ आमदार आहेत. एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.