Ajit Pawar : पवारांनी निवृत्ती मागे घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांचं वय अन् प्रकृती...

sharad pawar ajit pawar
sharad pawar ajit pawaresakal
Updated on

मुंबईः २ मे रोजी शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातून निराशेचा सूर उमटत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई सोडायला तयार नव्हते. शेवटी आज शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेत अध्यक्षपदी कायम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल," असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

sharad pawar ajit pawar
Sharad Pawar : निवृत्ती मागे घेतली पण पवारांच्या मनातला अध्यक्ष कोण? पत्रकार परिषदेत...

''आदरणीय साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा'', असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

sharad pawar ajit pawar
Sharad Pawar News : पवारांचं भाकरी फिरवण्याचं वक्तव्य ते राजीनामा परत घेणं; चार दिवसात नेमकं काय घडलं?

आदरणीय साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशीरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्या 6 तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. 7 तारखेला बारामती, 8 तारखेला कोरेगाव, सातारा, 9 तारखेला सातारा, फलटण. 10 तारखेला उस्मानाबाद, लातूर, 11 तारखेला नाशिक आणि 12 तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.