मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर आता कुणबी नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत आहे. याला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. यावरून राज्यातील सत्तेत एकत्रित असणाऱ्या नेत्यांमध्ये मतमत्तातरे दिसून येत आहेत. अशातच कोल्हापूर दौऱ्यावर असताना अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एकाच घरातील दोन भावांमध्ये मतभेद असतात, घरातील सर्वजण एकत्रित बसून चर्चा करून मार्ग काढतात, असं म्हणत चर्चेतून प्रश्न सुटतो असं वक्तव्य केलं आहे.
प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. वेगळे विचार असू शकतात, प्रत्येकाची पध्दत वेगळी असते. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मी कोणालाही धक्का न लावता यातून मार्ग काढेन असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. अशातच घरात दोन भाऊ असतात त्यांच्यामध्ये देखील अनेक मतभेद असतात. घरातील सदस्य एकत्रित बसतात आणि त्यामध्ये काही समज गैरसमज असतील ते दूर करतात, असं अजित पवार म्हणालेत.
पुढे बोलताना ते म्हणाले देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले आहेत, आम्ही मुंबईत छगन भुजबळांशी बोलू. यामध्ये कोणावर अन्याय झाला असं वाटतं नाही. मात्र, त्यांचे काही प्रश्न असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, आम्हाला छगन भुजबळांशी बोलण्यासाठी थोडासा तरी वेळ द्या आम्ही त्यांच्याशी बोलू असंही अजित पवारांनी पुढे म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल इतर समाज असेल कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांचं आरक्षण कमी न करता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता आरक्षण देण्याची भूमिका पहिल्या दिवसा पासून आहे. जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल. त्यामुळं छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत त्यांनी व्यवस्थितीत याची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल.
भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप अन् टोला
कालपासून आम्ही तेच सांगतोय की, अध्यादेश आम्ही शांतपणे वाचण्याचं काम करतो आहोत म्हणूनच शांतपणे बोलण्याचं देखील काम करतो आहे. मला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देताना पहिल्यांदा विश्वासात घेतलं ते म्हणजे निजामशाहीत त्यांच्या नोंदी सापडल्या तेव्हा. त्यासोडून त्यांना आपण कुणबी प्रमाणपत्र द्यायचं यावर मी सहमती दर्शवली.
पण याची जी व्याप्ती वाढत गेली आणि अधिसूचना काढली त्यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली नाही. मी ३५ वर्षांपासून ओबीसींसाठी राजकारण करतो आहे. त्यावेळी मी शिवसेना सोडली त्यावेळी तुमचा जन्मही झाला नसेल, ती परिस्थिती कशी असेल आता शिवसेना सोडणं सोपं आहे, अशा शब्दांत भुजबळांनी शिंदेंना टोलाही लगावला. तेव्हापासून आम्ही लढतो आहोत आणि लढत राहू असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.