Sahitya Sammelan : 97 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे; कोण आहेत डॉ. शोभणे?

Sahitya Sammelan
Sahitya Sammelanesakal
Updated on

मुंबईः ९७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. आज पुण्यात साहित्य मंडळाची बैठक संपन्न झाली.

प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक यांची नावे चर्चेत होती. त्यातून अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

Sahitya Sammelan
PM Modi In Egypt : PM मोदींचा पुन्हा एकदा गौरव! इजिप्तने सर्वोच्च पुरस्काराने केलं सन्मानित

डॉ. रवींद्र शोभणे यांना त्यांच्या साहित्यसंपदेमुळे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत. २००३मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

Sahitya Sammelan
गोफण | मम्मी मेरी शादी कर दो Gofan

डॉ. शोभणे यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती १९९४ साली प्राप्त झाली होती. मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून २००७ ते २०१२ यादरम्यान ते कार्यरत होते.

Sahitya Sammelan
Teaser of Emergency : आजच्याच दिवशी घडली भारतीय लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट!

जळगावच्या अंमळनेर येथे यंदाचे साहित्य संमेलन संपन्न होत आहे. शोभणे हे मूळचे नागपरचे. नागपूच्या नरखेड तालुक्यातील खरसोली या गावात त्यांचा जन्म झाला. तेथेच आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.

पुढे नागपूरच्या मॉरिस कॉलेजात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १९९१ मध्ये त्यांचा पहिा कथासंग्रह आला. वर्तमान नावाचा हा कथासंग्रह आहे. १९८९ मध्ये त्यांनी पीएचडी मिळवली.

''डॉ. रवींद्र शोभणेंच्या निमित्ताने वैदर्भीय प्रतिभेची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आभार'' अशी प्रतिक्रिया श्रीपाद भालचंद्र जोशी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.