Akola Crime: कारचा अपघात होताच आढळल्या कोट्यावधींच्या नोटा, गौडबंगाल काय? चौकशी सुरु

बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन आरोपींसह कार नोटा व एक यंत्र ताब्यात घेतले आहे.
Akola Crime: कारचा अपघात होताच आढळल्या कोट्यावधींच्या नोटा, गौडबंगाल काय? चौकशी सुरु
Updated on

Balapur: खामगावहून अकोल्याकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला असून कारमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोटा असल्याची बाब समोर आली आहे.

अपघातानंतर कारमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन आरोपींसह कार नोटा व एक यंत्र ताब्यात घेतले आहे.

Akola Crime: कारचा अपघात होताच आढळल्या कोट्यावधींच्या नोटा, गौडबंगाल काय? चौकशी सुरु
Police Recruitment : पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी आजपासून भरती

बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारस फाटा नजीक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूला जवळ कार व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

हा अपघात होताच कारच्या डिक्की मध्ये पाचशे रुपयांच्या नोटा दिसून आल्या. यावेळी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही बाब समजतच महामार्गावर एकच गर्दी झाली. ही माहीती वाऱ्यासारखी पसरली, घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी अपघातग्रस्त कार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आणली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामधे एक नोटा मोजण्याचे यंत्र, पाचशेच्या नोटा आढळून आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुशील अजमेरा व त्याचे दोन साथीदार यांना अटक केली. यावेळी काारमध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आले आहेत.

बाळापूर पोलीसांची दमछाक

अकोला येथे पोलीस भरती सुरु असल्याने पोलिसांची यंत्रणा अकोला येथे बंदोबस्तात आहे. बाळापूर ठाणेदार अनिल जुमळे हे देखील बंदोबस्तात आहेत. त्यामुळे कारवाई करताना बाळापूर पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांंची चांगलीच दमछाक झाली. रक्कम असलेल्या कारचा अपघात झाल्याने कार चालकासह अन्य दोघे जण व रक्कम ताब्यात घेतली. चौकशीवेळी मात्र, या सर्व नोटा खोट्या असल्याचे समोर आले. तरीही हा सर्वच प्रकार संशयास्पद असल्याने बाळापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Akola Crime: कारचा अपघात होताच आढळल्या कोट्यावधींच्या नोटा, गौडबंगाल काय? चौकशी सुरु
Nashik Police Recruitment: पोलीस भरतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा होणार वापर! RFID चीप घेणार धावणे, उंची अन्‌ बायोमेट्रिक नोंदी

बच्चो का बँक असलेल्या नोटा

अपघातग्रस्त कारमध्ये विस कोटी रुपये असल्याची अफवा पसरल्याने राष्ट्रीय महामार्गावर गर्दी झाली होती. पोलिसांनी पैशाची बॅग उघडून बघितली असता, त्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या नोटा त्यावर "चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया" असा उल्लेख केला असल्याचे आढळून आल्याने आणि पाचशे व शंभर रुपयाची एक नोट असे सहाशे रुपये आढळून आले. सदर बॅगेत खऱ्या किंवा खोट्या नोटा नसल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात या लहान मुलांच्या खेळण्यात येणाऱ्या नोटा कार मध्ये आल्या कशा? कारमध्ये या नोटा का नेल्या जात होत्या? या आल्या कुठून? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

आरोपी म्हणतात आमची फसवणूक झाली.

या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र आमची एका टोळीने फसवणूक केली असल्याचे आरोपी सांगत आहेत. "एक लाख रुपयांच्या बदल्यात दोन लाख " असे आमिष देऊन बाळापूर जवळील एका हॉटेल मध्ये आम्हाला बोलावले व खऱ्या पैशांच्या मोबदल्यात खोटे पैसे देऊन गेले. असे आरोपींनी पोलीसांना सांगितले. मात्र खरा प्रकार काय आहे. या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.

" पोलीसांनी एक कार ताब्यात घेतली असून त्यामध्ये खेळण्यातल्या नोटा व एक पैसे मोजण्याची मशीन आढळून आली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना देखील ताब्यात घेतले. चौकशी सुरू आहे.

- अनिल जुमळे

ठाणेदार, बाळापूर पोलीस स्टेशन

Akola Crime: कारचा अपघात होताच आढळल्या कोट्यावधींच्या नोटा, गौडबंगाल काय? चौकशी सुरु
Pimpri Crime : महिला सहाय्यक फौजदाराला मारहाण; दोघे अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.