Akshay Shinde Encounter : 'देवाभाऊचा न्याय' ते विधानसभा निवडणूक... अक्षय शिंदेच्या वकिलाचा हायकोर्टात खळबळजनक दावा

Akshay Shinde Encounter Case Latest News : बदलापूर येथील लैंगिकअत्याचार प्रकरणाती मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिस चकमकीत मृत्यू झाला.
Badlapur Encounter Case
Badlapur Encounter Case
Updated on

बदलापूर येथील लैंगिकअत्याचार प्रकरणाती मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय पक्षांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही चकमक फेक असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. दरम्यान अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांयांच्या वकिलांनी सोशल मीडियावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणाऱ्या पोस्टचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत.

या कथित चकमक प्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांनी अक्षयच्या मृत्यूचा एसआयटीकडून तपास करण्याची मागणी केली. या मागणीवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडून काही महत्वाच्या मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आले आहे.

त्यांनी एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, तसंच तिथलं सीसीटीव्ही जाहीर करा अशी मागणी हायकोर्टातील सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी केली. तसेच अक्षय शिंदे याच्या वडिलांच्या वकिलांनी दावा केला की, पोलिसांवर हल्ला करण्याचा अक्षयचा हेतू नव्हता, तसेच त्याने पालकांकडे दुपारी मनीऑर्डरची ‌मागणी केली होती.

Badlapur Encounter Case
Akshay Shinde Shot Dead: 'हे एन्काऊंटर म्हणता येणार नाही'; अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टाला संशय, सुनावणीत काय झालं? जाणून घ्या

म्हणून खून झाला

इतकेच नाही तर, त्याची (अक्षय शिंदे) हल्ला करण्याची हिंमत नव्हती. एकूणच मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी अक्षयचा खून झाला असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर आहे त्यासाठी अक्षयचा खून झाला असल्याचे वकिल म्हणाले. या प्रकरणाची विशेष तपास पथकाककडून (एसआयटी) चौकशी करावी अशी अक्षय शिंदेंच्या कुटुंबियांच्या वकिलांकडून उत्त न्यायलयात मागणी करण्यात आली.

या दाव्यासोबतच वकिलांनी सोशल मिडीयावरील ‌देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे 'देवाभाऊचा न्याय' हे स्क्रीनशॉट कोर्टात सादर केले आहेत. तसेच या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील शिंदे यांच्या वकिलांनी केली आहे.

Badlapur Encounter Case
Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

नेमकं काय झालं?

बदलापूर येथील एका शाळेत चिमुरडींवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.