अपघाताच्या प्रतिक्षेत जिल्हा रुग्णालयातील घसरता जिना; रुग्णांचा जीव धोक्यात

सरकत्या जिन्याच्या दुरुस्तीचे काम रखडले
Alibaug civil hospital
Alibaug civil hospitalsakal media
Updated on

अलिबाग : येथील जिल्हा रुग्णालयातील (Civil Hospital) सरकत्या जिन्याचा (Escalator collapse) काही भाग दोन महिन्यांपूर्वी कोसळला होता. त्यानंतर दुरुस्तीसाठी निधी मंजूर (Fund For repairing) झाला असला, तरी रुग्णालय प्रशासनाने (hospital authorities) ना हरकत पत्र (NOC) दिले नसल्याने हे काम रखडले आहे. आता हा जिना कोसळण्याच्या स्थितीत असून त्याला खांबांचा आधार देण्यात आला आहे. या प्रकारामुळे येथे दुर्घटनेची (Accident) भीती आहे.

Alibaug civil hospital
'शिवाजी पार्कसाठी दिवे इटलीतून आयात करणं हा योगायोग की लांगुलचालन?'

कोरोना कालावधीत जिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला; परंतु त्यानंतरही रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फरक पडलेला नाही. इमारतीच्या छतातून पाणीगळती होते. स्वच्छतागृहात दुर्गंधी असून पडझड झाली आहे. तीन वर्षांपूर्वी इमारतीच्या मुख्य भागाची दुरुस्ती करण्यात आली; पण जिन्याची दुरुस्ती केली नव्हती. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या एका भागाचा स्लॅब कोसळले. रुग्णालयातील लिफ्ट वारंवार बंद पडते. त्यामुळे या जिन्यांचा वापर अधिक होतो.

या संदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून जिन्याची दुरुस्ती करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी ५० लाखाचा निधी मंजूर केला आहे. आता हे काम सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला ना हरकत पत्र दिले नसल्याने हे काम रखडले आहे.

Alibaug civil hospital
मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्रीचा लैंगिक छळ, बिझनेसमॅनला अटक

"सरकत्या जिन्याचे जुने बांधकाम हटवावे लागणार असून त्या ठिकाणी नवीन जिना बांधावा लागणार आहे. या जिन्यावर ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वाहिनी आहे. त्याचबरोबर कोविड वॉर्डकडे जाण्यासाठी या जिन्याचा वापर केला जातो. जिन्यावरील वर्दळ बंद करून हे काम तातडीने करणे आवश्यक आहे; परंतु रुग्णालय प्रशासनाकडूनच कोणतेही सहकार्य मिळाले नाही."
- धनश्री भोसले, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग

"रुग्ण आणि इतर ओपीडी विभागांसाठी पर्यायी जागा नाही. त्यातच रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ सुरू असते. सरकत्या जिन्याजवळ ऑक्सिजन वाहिनी आणि अन्य केबल आहेत. त्याचबरोबर लिफ्ट बंद असल्याने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग अनेक वेळा बंद असतो."
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.