"विरोधकांचे सर्व धंदे उद्यानंतर बंद होतील"; संजय राऊतांचा इशारा

उद्याची पत्रकार परिषद पाहाच...भाजपसह केंद्रीय तपास यंत्रणांना संजय राउतांचं आव्हान
Sanjay Raut on CM Uddhav Thackeray Health
Sanjay Raut on CM Uddhav Thackeray HealthSakal
Updated on

मुंबई : शिवसेनेच्यावतीनं उद्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत (ShivSena Press Conference) आपण अनेक धक्कादायक खुलासे करणार असल्याचा दावा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच उद्याची पत्रकार परिषद भाजपसह (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांनी (Central Investigation Agencies) देखील पाहावी, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं आहे. (all actions of opposition will be closed after tommorow Sanjay Raut warning to BJP)

Sanjay Raut on CM Uddhav Thackeray Health
Share Market मध्ये मोठी पडझड; 1700 अशांनी कोसळला Sensex

राउत म्हणाले, "विरोधकांनी माझी पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनी तर आवर्जुन ऐकायला हवी. उद्या शिवसेना पक्ष नव्हे तर उद्या महाराष्ट्र बोलणार आहे. विरोधकांचे सर्व धंदे उद्यानंतर बंद होतील"

Sanjay Raut on CM Uddhav Thackeray Health
MGNREGA : काम केल्यानंतरच मिळणार पैसे, नियम अधिक कडक होणार?

शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र. महाराष्ट्र अन्यायाविरुद्ध प्रतिकार करेल. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला लढण्याची जी हिंमत दिली आहे ती उद्या दिसेल. केंद्रातून कोणीही उठतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो आणि इकडे भाजपवाले गांडुळासारखे बसून असतात, असा घणाघाती आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut on CM Uddhav Thackeray Health
उत्तर प्रदेशात दहा दिवस आधीच होणार होळीला सुरुवात - PM मोदी

कोणीही बाहेरच्या लोकांनी महाराष्ट्रात यावं आणि इथल्या मराठी लोकांना दमदाट्या कराव्यात असं चालणार नाही. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल. त्यांच्या सूचनेनुसारच उद्या पत्रकार परिषद होईल, असं सांगताना. विरोधकांची उद्या आम्ही पोलखोल करणार नाही कारण ते सर्वजण पोकळ आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.