Bachchu Kadu : सर्व पक्ष भाजपमध्ये विलीन करावे; बच्चू कडू यांचा पुन्हा हल्लाबोल

Bachchu Kadu and Devendra Fadnavis
Bachchu Kadu and Devendra Fadnavis
Updated on

मुंबई - प्रहार पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. काही दिवसांपूर्वीच माझ्या जिल्ह्यात मला भाजपचा खूप त्रास असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत सुरू असलेल्या सुनावणीवरही भाष्य केलं आहे.

Bachchu Kadu and Devendra Fadnavis
Veg Thali Cost: टोमॅटोचे दर घसरल्याने व्हेज-नॉनव्हेज थाळीच्या किंमतीत घट, कांद्यामुळे वाढू शकते चिंता

राष्ट्रवादीच्या सुनावणीवर बच्चू कडू म्हणाले की, त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. ती काही महत्त्वाची बातमी नाही. माध्यमाने दुसऱ्या बातम्या असतील तर पाहावं, असा सल्ला बच्चू कडू यांनी दिली. विरोधकांना अक्कल नसून कधी काय मागणी केली पाहिजे, याचं तारतम्य विरोधकांना आणि सत्तेतील लोकांनाही नाही.

नांदेड घटनेवरून मंत्र्यांचा राजीनामा विरोधकांकडून मागण्यात येत आहे. यावर बच्चू कडू म्हणाले की, माणसं बदलली पाहिजे की, व्यवस्था बदलली पाहिजे? व्यवस्था बदलली पाहिजे. देशात आमदार-खासदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था आहे. गरीबांसाठी वेगळी व्यवस्था आहे. विषमतेचं जे बीज पेरलं गेलं, ते तोडणं महत्त्वाचं आहे. यासाठी भगतसिंग शहिद झाले नव्हते. मृत्यूला जबाबदार व्यवस्था, असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

Bachchu Kadu and Devendra Fadnavis
Nanded Deaths : तुमच्या चुकांची शिक्षा गरिबांना का देता? आक्रोश करणाऱ्या 'त्या' महिलेचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

एकतर खासगी करा किंवा सरकारी ठेवा. सर्वांचा उपचार एका व्यवस्थेत झाला पाहिजे. आमदारासाठी वेगळी आणि सामान्य माणसासाठी वेगळी व्यवस्था ठेवली आहे. ते का नाही होत? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसेच मी आजारी पडलो तर सरकार ५० लाख रुपये देते आणि सामान्य माणसाला पाच लाख घे म्हणतात. ते जरी आले तरी तसं करणार नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी विरोधकांना टोला लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()